शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७० विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:20 IST

चामोर्शी शहरातील अनेक शाळांमध्ये नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून एकूण १७० गणवेशाचे वितरण

चामोर्शीत वितरण : न. पं. उपाध्यक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी शहरातील अनेक शाळांमध्ये नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून एकूण १७० गणवेशाचे वितरण आठवड्यात करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. चामोर्शी येथील कृषक हायस्कूलमध्ये मंगळवारी न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवार यांच्याकडून ३० मुलामुलींना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, धनराज मडावी, शिक्षक संजय कुनघाडकर, मोरेश्वर गडकर, लोमेश्वर पिपरे, गिरीष मुंजमकर, प्रकाश मठ्ठे, जासुंदा जनबंधू, वर्षा लोहकरे, लोमेश बुरांडे, दिलीप लटारे, अरूण दुधबावरे, दिलीप भांडेकर, मारोती दिकोंडावार उपस्थित होते. शहरातील जि. प. नूतन शाळेमध्ये २० गणवेश, जि. प. कन्या शाळेत २०, जि. प. प्राथमिक शाळा शंकरपूर हेटी येथे ३० गणवेश, शिवाजी हायस्कूलमध्ये २० गणवेश, यशोधरा विद्यालयात ३० गणवेश, बा. म. सहारे प्राथमिक शाळेत २० गणवेश, कृषक हायस्कूलमध्ये ३० गणवेश असे एकूण सात शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना १७० शालेय गणवेशाचे वितरण व साहित्य वाटप करण्यात आले. न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बुक, कंपास, पेन, पेन्सिल, साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे. गणवेश व शालेय वितरण प्रसंगी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.