शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१६४ ग्रा. पं. ची १00 टक्के करवसुली

By admin | Updated: May 29, 2014 02:17 IST

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे. या धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील तब्बल १६४ ग्रामपंचायतींनी सन २0१३-१४ या वर्षात १00 टक्के करवसुली केली आहे. यामुळे या ग्रामपंचायती जिल्हा परिषद प्रशासनाच्या कौतुकास पात्र झाल्या आहेत.ग्रापच्यावतीने दरवर्षी विशेष मोहीम राबवून गृहकर व पाणीपट्टी कराची वसुली केल्या जाते. यासाठी ग्रा. पं. प्रशासनाच्यावतीने जनजागृती केली जाते. जागृत नागरिक नियमित व वेळेत कराचा भरणा करतात. मात्र बहुतांश नागरिक कराचा भरणा करीत नाही. परिणामी ग्रामपंचायतीची करापोटी लाखो रूपयाची थकबाकी असते. कराच्या थकबाकीमुळे ग्रा. पं. प्रशासनाला विकास कामे करण्यास अडचण येते. १00 टक्के करवसुली करणार्‍या ग्रामपंचायतीला शासनाकडून विविध योजनेंतर्गत भरघोस निधी मिळतो. यातून गावात विकासात्मक कामेही मार्गी लावण्यास मदत होते.

सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात १00 टक्के करवसुली करणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, आरमोरी तालुक्यातील ५, देसाईगंज १, कुरखेडा ७, कोरची २२, धानोरा २६, चामोर्शी ६, मुलचेरा १३, एटापल्ली २0, अहेरी १0, भामरागड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील सर्वाधिक ३४ ग्रामपंचायतीने गृह व पाणीपट्टी कराची १00 टक्के वसुली केली आहे. जिल्हाभरात करवसुलीमध्ये सिरोंचा पंचायत समिती आघाडीवर असल्याचे दिसून येते.

(स्थानिक प्रतिनिधी)