गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने गुरूवारी लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सतिश तडकलावार, अधिपरिचारिका एस. डी. वाघुळकर, डॉ. प्रिया खोब्रागडे, फराह शेख, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनिल चौरासिया, लोकमतचे गडचिरोली येथील प्रमुख वितरक श्रीकांत पतरंगे, नागपूर येथील वितरण विभागाचे प्रतिनिधी सुबोध कुकडे, लोकमत युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, सखीमंचच्या संयोजिका प्रीती मेश्राम, बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार, संखीमंचच्या सदस्य सुनीता उरकुडे आदीसह लोकमत परिवारातील सर्व कर्मचारी वृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरात अभिनय खोपडे, दिगांबर जवादे, श्रीरंग कस्तुरे, वर्षा पडघन, किरण पवार, प्रियदर्शनी हायस्कूल धानोराच्या मुख्याध्यापिका जयश्री लोखंडे, रविंद्र सेलोटे, राजेश बटोलिया, पुरूषोत्तम नानाजी राऊत, अतुल मेश्राम, विनोद कोडापे, रामदास येमडवार, निलेश उंदीरवाडे, टेकाम, मनिष राऊत, अजिम कुरेशी, आदींनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिलीप दहेलकर, गोपाल लाजुरकर, विकास चौधरी, विवेक कारेमोरे, निखील जरूरकर, अमोल श्रीकोंडावार आदींनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजीच्या प्रतिमेला मार्लापण करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जीवनकार्यातील विविध घटनांवरही प्रकाश टाकला.
बाबूजींच्या जयंतीला गडचिरोलीत १६ जणांचे रक्तदान
By admin | Updated: July 3, 2015 01:38 IST