शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी कसारीतील १६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:54 IST

तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणा-या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वनविभागाने अटक केली.

कोरेगाव चोप (गडचिरोली) : तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणा-या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वनविभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले. कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी हा त्याच्या शेतात तारांत विद्युत प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करतो, अशी गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वनविभागाच्या कर्मचा-यांनी १९ मे रोजी मडावी याच्या शेतात जाऊन तपासणी केली.तिथे तार आढळून आले. शिकारीबाबत विचारले असता, त्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र वन विभागाच्या कर्मचा-यांना मडावीवर संशय असल्याने त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण वन्यजीवांची शिकार करीत असल्याचे मान्य केले. पुन्हा त्याच्या शेताची तपासणी केली असता, तणसाच्या ढिगात तीन रानडुकरांचे मुंडके व एक रानकुत्रा कुजलेल्या स्थितीत आढळून आला.वनविभागाच्या कर्मचा-यांनी अधिक चौकशी केल्यानंतर कसारी येथील ज्या नागरिकांना मांस विकले, अशा १५ व्यक्तींची नावे मडावी याने सांगितली. त्यामुळे वन कर्मचा-यांनी त्या १५ नागरिकांनाही अटक केली. मडावीसह इतर १५ व्यक्तींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने इतर १५ आरोपींची जामिनावर सुटका केली तर मडावी याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी एस. जी. कैदलवार, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे यांच्यासह वन कर्मचा-यांनी केली.