वाहनचालकांची होते ‘गोची’ : पुलावर जमा झाली आहे मातींघोट : येथून जवळच असलेल्या शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर या रस्त्यावर मागील १५ वर्षांत दोनवेळा पुलाचे बांधकाम झाले. तरीही पुलावरून पाणी असल्याने मार्ग बंद राहत आहे. येथे पूल बांधकाम करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर मार्ग सन १९९८-९९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी यांनी पुलाचे बांधकाम केले. नाल्यावरील पुलाचे बांधकाम कंत्राटदार पंजवानी यांच्या मार्फत करण्यात आले. सदर पाईप कालवट अवघ्या काही वर्षातच उभे राहू शकले नाही आणि नारायणपूर मार्गावरील नाल्यावरील पूल तुटला व वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना घोट बाजारपेठेकडे ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यानंतर शासनाने २०१३-१४ मध्ये शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर ते गहूबोडी या मार्गावर नवीन पाईप कलवट मंजूर केले आणि २०१४ मध्ये या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु मागील एकाच पावसात नारायणपूर आणि विष्णूपूर या दोन्ही पुलावरील साहित्य वाहून गेल्याने पुलाची उंची फारच कमी झाली आहे. पुलावर पाणी आल्यास माती भरून या मार्गावरची वाहतूक बंद होऊन जाते. येथे नवा पूल बांधावा, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे पत्र व्यवहारही केला आहे. (वार्ताहर)
१५ वर्षांत दोनदा पुलाचे बांधकाम तरीही मार्ग झाले बंद
By admin | Updated: July 29, 2015 01:43 IST