शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

१५ हजार शेतकऱ्यांनी दिली कृषी महोत्सवाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:37 IST

२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देमंगळवारी झाला समारोप : विविध स्टॉलच्या माध्यमातून जाणली आधुनिक शेतीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जि.प. कृषी सभापती कोंदडधारी नाकाडे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, नगरसेवक प्रमोद पिपरे, रेखा डोळस, शमा अली, प्रमिला कतलानी, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वंजारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त प्र. जू. वैद्य, चेतना लाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ७५ लाख ६२ हजार रूपयांच्या साहित्याची विक्री झाली. यामध्ये चार ट्रॅक्टर, थ्रेशर व रोटावेटर यांचा समावेश आहे.शेतकºयांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. सुमारे १ हजार २२२ शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. १७६ शेतकºयांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. मंगळवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्याध्यापक डॉ. संजय भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे कुणाल उंदीरवाडे यांनीही स्वत:चे अनुभव कथन केले. यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, सहायक अधीक्षक डी. जी. गेडाम, संगणक आज्ञावली रूपरेखक, बी. पी. गायकवाड, श्रीकांत कापगते, आशिष बन्सोड यांनी सहकार्य केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी सदर महोत्सव शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला, असे गौरवोद्गार काढले. आत्माच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.