शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी उपविभागात १५ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: February 5, 2017 01:33 IST

अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जि.प., पं.स. निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला वेग आला आहे.

 जिल्हा परिषदेसाठी सात अर्ज आलेत : सर्वाधिक अर्ज सिरोंच्यात गडचिरोली : अहेरी उपविभागात दुसऱ्या टप्प्यातील जि.प., पं.स. निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या कामाला वेग आला आहे. शनिवारपर्यंत अहेरी येथे सहा तर सिरोंचा येथे आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. भामरागड येथे एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. तर एटापल्ली येथे एका उमेदवाराचा अर्ज पं.स. करिता दाखल झाला आहे. सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ गणासाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदसाठी चार तर पंचायत समितीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. झिंगानूर-आसरअल्ली जिल्हा परिषद गणात तैनेनी सरीता रमेश यांनी अपक्ष म्हणून शनिवारी अर्ज दाखल केला. तर विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद जि.प. गणातून वरसे वैशाली जोगा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. नारायणपूर-जानमपल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातून जनगाम जयसुधा बानय्या यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा जि.प. मतदार संघातून जेट्टी शारदा मलय्या यांनीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पंचायत समितीच्या जाफ्राबाद गणातून पिडगू कविता सत्यम यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यांच्याशिवाय पेद्दी सरीता सुधाकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नारायणपूर पं.स. गणातून झोडे शकुंतला सखाराम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विठ्ठलरावपेठा पं.स. गणातून वेलादी बानक्का शंकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज म्हणून दाखल केला आहे. एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी पं.स. गणातून भाराकाँतर्फे शालिक गणुजी गेडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केला. भामरागड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणासाठी शनिवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)