शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत अहेरीत अग्निशमन वाहन दाखल होणार

By admin | Updated: May 29, 2017 02:23 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागात सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतींना

आगीच्या घटनांवर येणार नियंत्रण : डीपीडीसीच्या ७५ लाख रूपयांतून अग्निशमन वाहन केले होते मंजूरविवेक बेझलवार । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागात सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतींना अग्नीशमन वाहन जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून मंजूर केले. सदर वाहन तयार करण्याचा अवधी १३ जूनला संपणार आहे. येत्या १५ दिवसांत अहेरी शहरात नगर पंचायत प्रशासनाकडे तब्बल ७५ लाख रूपयांचे अग्नीशमन वाहन दाखल होणार आहे.पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वात सन २०१५-१६ मध्ये झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत अहेरी उपविभागातील सिरोंचा व अहेरी या दोन नगर पंचायतीला अग्नीशमन वाहनांसाठी प्रत्येकी ७५ लाख रूपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेच्या अधिन राहून सन २०१५-१६ च्या डिसेंबरअखेर अग्नीशमन वाहनासाठी ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. सदर वाहन खरेदीसाठी फेब्रुवारी २०१७ ला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ई-टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदर अग्नीशमन वाहन बनविण्याची जबाबदारी पुणे येथील हायटेक सर्व्हिसेसला देण्यात आली. या संदर्भात १४ मार्च २०१७ रोजी कार्यारंभ आदेश घेऊन अग्नीशमन वाहन बांधणीसाठी परवानगी देण्यात आली. कार्य आदेशानुसार तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण करावयाचे होते. दरम्यान २८ मार्च २०१७ ला अहेरीचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके हे पुण्याला गेले. त्यांनी अग्नीशमन वाहनाचे चेसीस्ट निरिक्षण व डिझाईन मान्यतेसाठी चालू कामाचा आढावा सुध्दा घेतला. कार्य आदेशानुसार येत्या १३ जूनला अग्नीशमन वाहन तयार करून देण्याचा कालावधी संपत आहे. त्यामुळे १५ ते १७ दिवसांत अहेरी नगर पंचायतीला हे अग्नीशमन वाहन मिळणार आहे. अहेरी परिसरात आजवर झालेल्या आगीच्या घटनेत अनेक घरे, दुकाने व गोदाम जळून खाक झाली. गडचिरोली व चंद्रपूर येथून अग्नीशमन वाहन घटनेच्या वेळी पाचारण करावे लागत होते. आता अग्नीशमन वाहन उपलब्ध होणार आहे