शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणावर १५ कोटी खर्च

By admin | Updated: April 15, 2017 01:24 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली.

वर्षभरात : जलयुक्त शिवार अभियानाने सिंचन क्षेत्र वाढले; कृषी विभाग कामात आघाडीवर गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली. या गावांमध्ये आतापर्यंत १ हजार ६ कामे पूर्ण करण्यात आली असून ७६९ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांवर सन २०१६-१७ या वर्षात एकूण १५ कोटी ४० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. भाजपप्रणित राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली. सन २०१५-१६ वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेच्या कामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मजगी, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिंचन विहीर बांधकाम, भातखाचरे, बोडी दुरूस्ती, खोदतळे, मामा तलाव दुरूस्ती, वन व गाव तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती, भूमिगत बंधारे आदी जलसंधारणाची कामे घेण्यात आली. या कामातून गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद नरेगा व जिल्हा परिषद सिंचाई विभाग तसेच लघु सिंचन (जलसंधारण) आणि पाटबंधारे विभागामार्फत जलसंधारणाची विविध कामे सन २०१६-१७ या वर्षात घेण्यात आली. सदर कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला व सदर निधी यंत्रणानिहाय वितरित करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावे निवडली जातात. त्यानंतर गाव आराखडा तयार केला जातो. या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून जिल्हा आराखड्याला अंतिम मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी) लोकसहभागातून ३० कामे पूर्णत्वास जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण आदी कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षात कृषी विभागामार्फत पाच व जि.प. सिंचाई विभागामार्फत २५ अशी एकूण ३० कामे करण्यात आली. या कामांवर एकूण १०२.१८ लाख रूपयाचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. १७ कामांना प्रारंभच नाही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या १७ कामांना अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची माहिती आहे. प्रकल्प आराखड्यानुसार कामांच्या टक्केवारीनिहाय तपशील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे.