शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:57 IST

नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामांची यादी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व संमतीने शहरातील विकास कामे मंजूर करण्यात आल्यानंतर सदर कामासाठीचा प्रस्ताव यादीसह राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला.

ठळक मुद्देअवर सचिवांचे आदेश धडकले : नगर पालिकेच्या पुढाकाराने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात होणार ३५ वर कामे

दिलीप दहेलकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामांची यादी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व संमतीने शहरातील विकास कामे मंजूर करण्यात आल्यानंतर सदर कामासाठीचा प्रस्ताव यादीसह राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर नगर विकास विभागाने सन २०१८-१९ या वर्षात गडचिरोली शहरातील ३५ वर कामांसाठी निधी मंजूर करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. या संदर्भातील राज्य शासनाच्या अवर सचिवांचे आदेश जिल्हा व नगर परिषद प्रशासनाला धडकले आहे.राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने ठराव मंजूर करून यादीत नमूद केलेल्या कामांसाठीच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. या कामांसाठी नगर परिषदेला जवळपास १५ कोटींचा निधी मंजूर करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नगर परिषदेने प्रस्तावात नमूद केलेली सदर कामे मागील पाच वर्षात झाली नाहीत अथवा पाणीपुरवठा व मलनित्सार प्रकल्पामुळे नव्याने घेण्यात येणारी कामे बाधित होणार नाही, याची खातरजमा करावी, असे अवर सचिवांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.नगर पालिकेने निश्चित केलेल्या कामांना मान्यता देऊन तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रदान करून प्रशासकीय मान्यता व निधी वितरणासाठी याबाबतचा प्रस्ताव शासनास जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे आदेशात राज्यशासनाने म्हटले आहे. याबाबतचे नगर विकास विभागाच्या अवर सचिवांचे आदेश २९ आॅक्टोबर २०१८ रोजी पत्रान्वये प्राप्त झाले आहे.४ जून २०१८ रोजी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील रस्ते, नाली व इतर विकास कामांना मंजुरी देऊन ठराव घेण्यात आले. त्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने कामांची अंदाजे किंमत ठरवून याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा विचार करून शासनाने आता जवळपास १५ कोटींच्या निधी मंजुरीस तत्त्वता मान्यता प्रदान केली आहे.गडचिरोली शहरात होणार ही कामेविसापूर टोली ते वैनगंगा नदीघाटापर्यंत पांदण रस्त्याचे मातीकाम, लांझेडा-खरपुंडी ते कठाणी नदीपर्यंत पांदण रस्ता, बलकीदेव ते एसटीपीकडे जाणारा पांदण रस्ता, रामनगर पोटेगाव बायपास रोड ते राममंदिर ते नेताजी सुभाष चौक पासून हनुमान मंदिर ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदीस्त नालीचे काम, सोनापूर प्रभाग क्र. ११ मध्ये रोड खडीकरण व नाली बांधकाम, गोकुलनगर प्रभाग क्र.७ मध्ये शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय ते पाणी टाकीला जोडणाºया रस्त्याचे डांबरीकरण, स्नेहनगरात मोकळी जागा विकसित करणे, कॅम्प एरिया प्रभाग क्र.६ मध्ये ओपन स्पेस विकसित करणे, सोनापूर वॉर्डात खडीकरण व नाली बांधकाम, लांझेडा प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट व नाली बांधकाम, प्रभाग क्र.९ मध्ये हनुमान मंदिर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिमेंट रोड बांधकाम आदीसह जवळपास ३७ कामांचा समावेश आहे.वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदानातून नगर विकास विभागाच्या वतीने शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जवळपास १५ कोटींचा निधीस मान्यता देण्यात आली आहे. ठराव घेऊन प्रस्तावित नमूद केलेल्या कामांची तांत्रिक मान्यता घेण्याची कार्यवाही पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त निधीतून शहरात ही सर्व विकास कामे सुरू करण्यात येणार आहे. सदर निधी लवकर मिळावा, यासाठी आपला शासनाकडे प्रयत्न आहे.- योगीता प्रमोद पिपरे,नगराध्यक्ष, गडचिरोली