शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

५०० कर्मचाऱ्यांसाठी १५ बाय २० फूटची ‘रेस्टरूम’

By admin | Updated: March 6, 2015 01:31 IST

गडचिरोली एसटी आगारातील ५०० वाहक व चालकांना विश्रांती करण्यासाठी बसस्थानकासमोरच १५ बाय २० फूट आकाराची खोली बनवून देण्यात आली आहे.

गडचिरोली : गडचिरोली एसटी आगारातील ५०० वाहक व चालकांना विश्रांती करण्यासाठी बसस्थानकासमोरच १५ बाय २० फूट आकाराची खोली बनवून देण्यात आली आहे. या खोलीमध्ये दोन पंख्यांच्या व्यतिरिक्त कोणतीही सुविधा नाही. नाव रेस्टरूम असले तरी या ठिकाणी एकही गादी नाही. अर्ध्यापेक्षा अधिक जागा कर्मचाऱ्यांच्या पेट्यांनी व्यापली आहे. त्यामुळे या खोलीत दहापेक्षा जास्त व्यक्ती बसूही शकत नाही. येथील अवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना कर्मचाऱ्यांनी ही रेस्टरूम नसून खुराडा असल्याची प्रतिक्रिया देत या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडचिरोली हे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गडचिरोली येथून राज्याच्या इतर भागात अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या जातात. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या ये-जा करण्याची सुविधा गडचिरोली येथील एसटी आगार उपलब्ध करून देते. गडचिरोली आगारात एकूण ९५ बसेस असून दररोज १०५ शेड्यूल आहेत. वाहक व चालक असे एकूण जवळपास ५०० कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. आगारामध्ये बस आल्यानंतर वाहक व चालकांना थोडीफार विश्रांती मिळावी, यासाठी बसस्थानकाच्या समोरच १५ बाय २० फूट आकाराची विश्रांती रूम बांधण्यात आली आहे. या विश्रांती रूममध्ये दोन पंखे व एक बल्ब वगळता इतर कोणत्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. दोन बाजुला दोन खिडक्या आहेत. मात्र या खिडक्यांचे तावदान पूर्णपणे फुटले आहे. छतावर टीन झाकण्यात आले असून टिनांच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सिलिंग लावण्यात आली आहे. मात्र सदर सिलिंग पूर्णपणे तुटली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या खोलीला रंगरंगोटी करण्यात आली नाही. नावाने विश्रांती रूम असली तरी या ठिकाणी एकही गादी नाही. त्यामुळे पाच-दहा मिनिटासाठी कर्मचारी थोडा झोपू शकत नाही. आगाराच्या अगदी समोर असल्याने दिवसभर या ठिकाणी बसचा आवाज व प्रवाशांचा गोंगाट सुरू राहतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास या खोलीत दिवसाही रात्रीप्रमाणे अंधार पसरतो. दिवसाढवळ्या डासांचा त्रास येथील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकंदरीतच या खोलीची अवस्था बघितल्यास कोणताच व्यक्ती या खोलीला आराम करण्याची खोली संबोधणार नाही. तिची रचना कबुत्तरांच्या खुराड्याप्रमाणे करण्यात आली आहे. येथील दुरवस्थेमुळे वाहक व चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ज्या विभागासाठी आपले आयुष्य दावणीला लावले आहे, ते विभाग आराम करण्यासाठी एक चांगली खोली बांधून देत नसल्याबाबत तीव्र नापंसती व्यक्त केली. दुरवस्थेला त्रासून अनेक वाहक व चालक बसस्थानकातील ओट्यांवर थांबून पाच-दहा मिनीटे घालविणे पसंत करीत आहेत. आगारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी केवळ तीन शौचालये आहेत. या शौचालयांची स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे.