शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

१४८ शाळा दुरूस्तीचे काम रखडले

By admin | Updated: December 27, 2014 22:51 IST

आर. आर. पाटील पालकमंत्री असताना जिल्हा वार्षिक योजनेतून अंदाजे साडेसात कोटी रूपयाचे काम १४८ शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. मात्र या कामाच्या वाटपाची

गडचिरोली : आर. आर. पाटील पालकमंत्री असताना जिल्हा वार्षिक योजनेतून अंदाजे साडेसात कोटी रूपयाचे काम १४८ शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. मात्र या कामाच्या वाटपाची नियमबाह्य प्रक्रिया जिल्हा परिषद यंत्रणेने राबविल्यामुळे या प्रक्रियेवर जि.प. सदस्यांनी आक्षेप घेतले. या आक्षेपानंतर दोन महिन्याचा कालावधी लोटूनही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमबाह्य प्रक्रिया दुरूस्त केलेली नाही. त्यामुळे शाळा दुरूस्तीचे काम रखडलेले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून १४८ शाळांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. जिल्हा वार्षिक योजनेचा हा निधी असल्याने याच्या निविदा काढण्याचे काम जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीमार्फत करणे आवश्यक होते. हे काम ग्रामपंचायत, त्यांनी न केल्यास मजूर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांच्या मार्फत करण्याचा प्रघात आहे. यांनी जर काम करण्यास नकार दिल्यास मग निविदा प्रक्रिया करून काम करावे लागते. मात्र सदर निधी जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व शिक्षा अभियानातून आल्याचे दाखवून थेट निविदा प्रक्रियाच प्रारंभ केली. निविदेची सूचना कुणालाही माहित होणार नाही, अशा पध्दतीने राबविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावरही निविदा प्रक्रियेचे कागदपत्र झाकून ठेवण्यात आले, असा आरोप सदस्यांनी केला आहे. या नियमबाह्य झालेल्या प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेच्या सभापतींसह ५ ते ७ सदस्यांनी लेखी स्वरूपात आक्षेप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नोंदविले. नियमबाह्य प्रक्रिया होऊनही या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप सुरू केलेली नाही. दोन महिन्यांचा कालावधी यामध्ये लोटून गेला. उलट जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुख नियमबाह्य झालेल्या या प्रक्रियेला दुरूस्त करण्याऐवजी आपण आक्षेप नोंदविले तर आलेला निधी परत जाईल, अशी भूमिका घेऊन असल्याचे तक्रारकर्त्या जि.प. सदस्यांचे म्हणणे आहे. दिशाभूल करून राबविण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेवर फेरविचार करण्याऐवजी जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख झालेल्या प्रक्रियेचे समर्थन करीत असल्याचे चित्र प्रशासकीय वर्तुळात निर्माण झाले आहे. या प्रकरणात जि.प. प्रशासकीय प्रमुखांकाकडून निर्णय होत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून १४८ शाळांच्या दुरूस्तीचे काम रखडलेले आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)