शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

१४४ ग्रा.पं.चे प्रस्ताव सादर

By admin | Updated: May 9, 2017 00:44 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयाचे १०० टक्के काम करणाऱ्या ...

गोदरीमुक्तीसाठी : पाच तालुक्यांत शौचालयांचे काम १०० टक्केदिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयाचे १०० टक्के काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्ती गाव म्हणून घोषीत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे एप्रिल अखेर सादर केले आहे. राज्यस्तरीय समिती मार्फत तपासणीअंती जिल्ह्यातील ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेला देसाईगंज वगळता इतर ११ तालुक्यांसाठी एकूण ३४ हजार २४९ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षासाठी दिले होते. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ११ तालुक्यात एकूण ३१ हजार २०२ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. भाजपप्रणित केंद्र शासनाने देशातील व महाराष्ट्रातील सर्व शहरे व गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम आखून वैयक्तिक शौचालये मोठ्या प्रमाणात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात ११ तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये तब्बल ३४ हजार २४९ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व शौचालयांचे काम १०० टक्के पूर्ण करावे, असा अल्टीमेटम शासनाने दिला होता. ३१ मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के शौचालयाचे काम करण्यासाठी प्रशासनासह गावातील ग्रामसेवक व पदाधिकारीही सक्रीय झाले होते. त्यामुळे मार्च महिन्यात शौचालयाच्या बांधकामाने सर्वत्र वेग घेतला होता. मात्र शौचालयाचे १०० टक्के काम झाले नाही. त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली. या तारखेपर्यंत भामरागड, चामोर्शी, धानोरा, गडचिरोली व कुरखेडा या पाच तालुक्यातील शौचालयाचे १०० टक्के काम पूर्ण केले. इतर सहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी शौचालयाचे काम १०० टक्के पूर्ण केले.राज्यस्तरीय समितीतर्फे नोव्हेंबरमध्ये होणार गावांची तपासणीशौचालयाचे १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या १४४ ग्रामपंचायतीना गोदरीमुक्तीचा दर्जा मिळण्यासाठी जि.प. प्रशासनाने एप्रिल २०१७ अखेर प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर ग्रामपंचायतीच्या गावांची राज्यस्तरीय समितीमार्फत नोव्हेंबर महिन्यात तपासणी होणार आहे. त्यानंतर मुल्यांकनाअंती ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त घोषीत करण्यात येणार आहे. सदर गावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे या पंचायतींना पंचायत समिती व जिल्हास्तरावरील रोख पुरस्कार प्राप्त होणार आहे. गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायती गोदरीमुक्त झाल्या.