शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

१४ विद्यार्थी अहेरीच्या रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:32 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी

राजपूर पॅच येथील प्रकार : नाश्त्यानंतर पोटदुखीचा त्रास वाढला अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना सकाळच्या नाश्तानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. पोटदुखीचा त्रास असलेल्या सर्वच १४ विद्यार्थ्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता स्थानांतरित विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेअंतर्गत हंगामी वसतिगृहाची सुविधा करण्यात आली आहे. तालुक्यातील राजपूर पॅच येथील जिल्हा परिषद शाळेतील हंगामी वसतिगृहात ३६ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांना आलुपोहाचा नाश्ता देण्यात आला. नाश्ता आटोपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतले. त्यानंतर १०.३० वाजता शाळेत आले. यावेळी विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यामध्ये पूनम मोहुर्ले (७), तन्वी दुर्योधन (१०), स्नेहा कंपेलवार (९), आकाश कोटरंगे (१०), निवेदिता बच्छर (११), वैष्णवी शेंडे (७), अक्षरा हजारे (९), अखिलेश निकुरे (१०), रजिया पठाण (११), सुवासिनी वसाके (११), आरती कुंदनवार (१०), प्रीती चटारे (१०), सोनाली रामगुंडेवार (१०), विष्णू गुरनुले यांचा समावेश आहे. सदर १४ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. लागलीच शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. वडेट्टीवार यांनी आपल्या सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. संजय उमाटे, डॉ. ईशांत तुरकर, डॉ. अनुपमा बिश्वास, डॉ. पल्लवी रूपनारायण, डॉ. योगीता हरीणखेडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. शर्तीचे उपचार करून विद्यार्थ्यांची प्रकृती आटोक्यात आणली. सध्या २ मुले, १२ मुली असे एकूण १४ विद्यार्थी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. (तालुका प्रतिनिधी) पोटदुखी नेमकी कशामुळे? राजपूर पॅच येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व उपसरपंच सुरेश गंगाधीरवार यांनी सांगितल्यानुसार, सदर जिल्हा परिषद शाळा परिसरात असलेल्या हातपंपातून गढूळ पाणी येत होते. याच पाण्याचा वापर शाळा तसेच गावकरी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाश्तातून अथवा हातपंपाच्या गढूळ पाण्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास कोणत्या कारणाने झाला, हा सध्या संशोधनाचा विषय आहे. सदर प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार वर्षांपूर्वी आरमोरी तालुक्याच्या लोहारा शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.