शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

१४ रस्त्यांच्या कामांकडे कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:08 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या मिटविण्यासाठी संबंधित यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असली तरी अलिकडे वाढलेल्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. वारंवार निविदा काढूनही ६१ कोटी रुपये किमतीच्या १४ कामांसाठी कोणीच कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आता सुरू आहे ती कामे पूर्णत्वास नेण्याकडे यंत्रणेचा कल वाढला आहे.

ठळक मुद्दे१८ वेळा निविदा : जाळपोळीच्या घटना वाढल्याने दहशत, जुनी कामे पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या मिटविण्यासाठी संबंधित यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असली तरी अलिकडे वाढलेल्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. वारंवार निविदा काढूनही ६१ कोटी रुपये किमतीच्या १४ कामांसाठी कोणीच कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आता सुरू आहे ती कामे पूर्णत्वास नेण्याकडे यंत्रणेचा कल वाढला आहे.दुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतू गेल्या ६ महिन्यात रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या वाहनांची जाळपोळ करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यात काही कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे दुर्गम भागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी कोणी कंत्राटदार पुढे येत नसल्याचे दिसून येते. यातूनच अनेक कामे अर्धवट स्थितीत येऊन पडली आहेत. ती कामे पूर्णत्वास नेल्याशिवाय नवीन कामांच्या निविदाच काढायच्या नाहीत, असे आता या यंत्रणेने ठरविले आहे. निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आता नवीन कामे हाती घेण्याऐवजी जुनीच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.सध्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २००७-०८ मधील ८६ किलोमीटर लांबीची १७ जुनी कामे चालू आहेत. २ जुनी कामे निविदा प्रक्रियेत आहेत तर ३१ किलोमीटरच्या ५ कामांसाठी नव्याने प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे. नवीन कामांपैैकी २०५ किलोमीटर लांबीची ५६ कामे चालू आहेत. २२ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मुख्य रस्त्यावरील असल्याने ती करण्यात फारशी अडचण जात नाही. परंतू प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे दुर्गम भागातील असल्यामुळे अनेक आव्हानांना तोंड देत ती पूर्ण करणे कठीण झाल्याची व्यथा अधिकारी सांगतात.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ कामांच्या निविदांना प्रतिसाद मिळाला. त्यापैैकी १४ च्या वर्क आॅर्डर झाल्या आहेत.वर्षभरात ६ वेळा निविदाप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १२ रस्त्यांच्या कामांसाठी या विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ६ वेळा निविदा मागविल्या. ५५ कोटी ३९ लाखांच्या या कामासाठी कोणीही कंत्राटदार निविदा भरण्यास पुढे आलेले नाही. या कामांमध्ये १० कामे भामरागड तालुक्यातील आहेत. एक काम अहेरी तर दुसरे धानोरा तालुक्यातील आहे. याशिवाय २००७-०८ मध्ये मंजूर असलेल्या भामरागड तालुक्यातील ६ कोटी ७९ लाखांच्या दोन कामांसाठी तब्बल १८ वेळा निविदा काढण्यात आल्या. परंतू ती कामे करण्यासाठीही कोणी कंत्राटदार पुढे आलेले नाही.