शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ शेतकरी गटांना यंत्रसहाय्य

By admin | Updated: February 29, 2016 00:57 IST

शेतीत यंत्राचा अधिकाधिक वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी तसेच टंचाईच्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी ...

२०१४-१५ वर्षात वितरण : पॉवर टिलर, धान रोवणी, कोनोविडर, मळणी संचगडचिरोली : शेतीत यंत्राचा अधिकाधिक वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी तसेच टंचाईच्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी मानव विकास मिशन योजना, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, कृषी प्रक्रिया योजना, विशेष सहाय्य योजनेंतर्गत गडचिरोली पंचायत समितीच्या वतीने २०१४-१५ या वर्षात ९० टक्के अनुदानावर एकूण १४ शेतकरी गटांना यंत्र संचाचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पंचायत समितीच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत एक पॉवर टिलर, एक भात रोवणी यंत्र, १० कोनोविडर, एक भात कापणी यंत्र, मळणी यंत्र सहा शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत एक पॉवर टिलर, भात रोवणी यंत्र, १० कोनोविडर, एक मळणी यंत्र दोन शेतकरी गटांना, कृषी प्रक्रिया योजनेंतर्गत आटाचक्की, मिरची कांडक यंत्र, तेलघाणी, वजन काटा तीन शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. तसेच विशेष सहाय्या योजनेंतर्गत दालमिल, स्पायरल, सेप्रेटर, धान्य कोटी व इतर साहित्य तीन शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. २०१४-१५ या वर्षात एकूण १४ शेतकरी गटांना यंत्र सहाय्य करण्यात आले. याशिवाय २०१५-१६ विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना योजनेंतर्गत शेतकरी गटांना लाभ दिला जाणार आहे. याकरिता मंजुरीही प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणाऱ्या यंत्रांची किंमत बाजारात ९ लाख ५६ हजार ३०२ रूपयांच्या आसपास आहे. परंतु शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर लाभ दिला जात आहे. शेतकरी गटांना केवळ ८२ हजार ८१२ रूपये याकरिता जमा करावे लागतात. (शहर प्रतिनिधी)