शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीतील १४ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:45 IST

मंगळवारी व बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने चामोर्शी शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

६५ हजारांचे नुकसान : महसूल विभागामार्फत पंचनामा लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : मंगळवारी व बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने चामोर्शी शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यांच्या अन्नधान्याची नासधूस झाली. अतिवृष्टीने १४ घरांची पडझड झाल्याने अंशत: ६५ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यादरम्यान दिसून आले आहे. घरांच्या भिंती, शाळेची भिंत, संरक्षण भिंत, शौचालयाची भिंत, माती व कुडाच्या झोपड्यांची पडझड झाली आहे. लक्ष्मण वासेकर, यादव वासेकर, बाबाजी गडकर, अनिल पालकर, सुरेश सोनटक्के, दिलीप पोतराजवार, जनार्धन कागदेलवार, उसन म्हशाखेत्री यांच्या घरांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषद नुतन शाळा, कल्पना डांगे, सुधाकर श्रीरामे, आशन्ना आसनवार, कारूजी चिमुरकर या नागरिकांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी पुरूषोत्तम बोदलकर, तलाठी डी. एस. शेडमाके, कालिदास मांडवगडे यांनी पडझड झालेल्या घरांना प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने अनेक नागरिकांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धान रोवणीची कामे सुरू असताना नागरिकांना घर दुरूस्ती करावी लागत आहे. धानाच्या शेतीसाठी गोळा करून ठेवलेला पैसा आता घर दुरूस्तीसाठी वापरावा लागणार आहे. काही नागरिकांकडे तर पैसेही नाही, अशा नागरिकांसमोर घर दुरूस्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नागरिकांना महसूल विभागाच्या वतीने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त नागरिकांनी केली आहे. तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमिनीवरील धानपीक व बांधीचे पारे भुईसपाट झाले आहेत. रोजगार हमी योजनेतून पारे टाकून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.