शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त करून तब्बल ५ हजाराचा मुद्देमाल व साहित्य नष्ट केले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे उल्लंघन : मोहफुल सडव्यासह ७० हजारांचा मुद्देमाल नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : विदेशी दारूची आवक बंद झाल्यामुळे सध्या सिरोंचा तालुक्यात गावठी मोफुलाची दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरून लपून दारू गाळणाऱ्या चार गावातील तब्बल १४ हातभट्ट्यांवर पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून मुक्तिपथ गाव संघटना व तालुका चमूने तब्बल ७० हजाराचा मुद्देमाल व गावठी दारू शुक्रवारी जप्त केली.कोरोंना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्याला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेथून कुणीही तालुक्यात दाखल होऊ नये यासाठी सिरोंचा पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्याचबरोबर लोकांनी लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही केले जात आहे. परिणामी तेलंगणा राज्यातून होणारी विदेशी दारूची तस्करी कमी झाली आहे.पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त करून तब्बल ५ हजाराचा मुद्देमाल व साहित्य नष्ट केले. सूर्यरावपल्ली या गावात तब्बल ६ ठिकाणी धाड टाकून ८ ड्रम गुळाचा सडवा व इतर साहित्य असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल नष्ट केले. पाच जणांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मद्दीकुंटा या गावी ६ ठिकाणी धाड टाकून पोलीस व मुक्तिपथ चमूने १५ लीटर दारू जप्त केली. तिघांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जानमपल्ली येथे एका घरी धाड टाकून जमिनीत गाडलेला चार ड्रम गुळसडवा नष्ट केला. तब्बल २० हजाराचा मुद्देमाल यावेळी सापडला.दारू गाळण्यासाठी लागणारा गुळही महागला असल्याने गाळली जाणारी दारूही जास्त दराने विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन पाळून अवैध धंदे बंद करण्याची तंबी यावेळी पोलिसांनी दारू गाळणाऱ्यांना दिली. पोलीस निरीक्षक अजय अहीरकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे, शीतल दविली आणि सेलोकर यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाया करण्यात आल्या.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा