शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१३८ हातपंपाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:27 IST

भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योजनांमधून निधी : पाणी टंचाई निवारणार्थ होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. त्यापैकी ७१ हातपंप खोदून पूर्ण झाले आहेत. तर ६७ हातपंप खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हातपंपांमध्ये भर पडल्याने पाणी टंचाईचे सावट कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील पाण्याची गरज विहीर व हातपंपांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. विहिरीसाठी अधिक निधी व जागा लागते. विहीर खोदण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विहिरीपेक्षा हातपंप खोदण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हातपंपांची मागणी वाढत चालली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी शासन सुध्दा विविध योजनांंतर्गत हातपंप खोदून देत आहे.२०१७-१८ या वर्षात विविध योजनांतर्गत १३८ हातपंप खोदण्यात आले आहेत. १३ वने अंतर्गत ५७ हातपंप, खासदार निधीतून ११ हातपंप, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात एक हातपंप असे एकूण ७१ हातपंपांचे खोदकाम पूर्ण झाले असून सदर हातपंप सुरू सुध्दा झाले आहेत. त्याचबरोबर आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३५ नवीन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर हातपंप खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता यांनी दिली.करारनामे न झाल्याने यांत्रिकी विभाग अडचणीतहातपंप दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर यांत्रिकी उपविभाग स्थापन करण्यात आला आहे. या उपविभागाचे प्रत्येक पंचायत समितीमध्ये हातपंप दुरूस्ती वाहन व कर्मचारी आहेत. हातपंप दुरूस्त करण्यासाठी संबंधित हातपंपाचा यांत्रिकी विभागासोबत करारनामा होणे आवश्यक आहे. करारनामा झाल्यानंतर ग्रामपंचायत एक विशिष्ट रक्कम यांत्रिकी विभागाला उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८३२ हातपंपांपैकी सुमारे २ हजार ५१ हातपंपांचे करारनामे झाले नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. करारनामा झाला नसला तरी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन सदर हातपंप दुरूस्त केला जातो. यामुळे यांत्रिकी विभागाचा तोटा आहे. सर्वच हातपंपांचे करारनामे करणे सक्तीचे करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.८८ हातपंप आढळले बंदगडचिरोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ८३५ हातपंप आहेत. त्यापैकी ७ हजार ७८४ हातपंपांचा पंचायत समितीमार्फत दुरूस्तीचा करारनामा झाला आहे. चालू आठवड्यात यातील ८८ हातपंप बंदस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. मागील आठवड्यात १४८ हातपंप बंद पडले होते. सदर हातपंप दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण हातपंपापैकी ९ हजार ४४५ हातपंप सुरू आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई