शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:09 IST

राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या कर्जदारांना दिलासा : राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी सुरूच

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२५९ कर्जदार शेतकऱ्यांपैकी १३४८ शेतकऱ्यांचे कागदपत्रे आता जुळली असून त्यांची नावे लवकरच ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.जिल्हा सहकारी बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्याही अनेक खातेदारांची कागदपत्रे जुळली नव्हती. मात्र त्यांची पडताळणी अद्यापही सुरूच असून किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे उपलब्ध झालेली नाही.अनेक प्रकारची माहिती सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर त्यांची विविध टप्प्यांवर पडताळणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची माहिती जुळत नव्हती. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असूनही त्यांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला नाही. आता त्यापैकी जिल्हा बँकेच्या १३४८ कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ९११ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून बाद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची संधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नव्याने अर्ज करणाऱ्यांचे वांदेकर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी विविध कारणांनी अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना एक संधी म्हणून ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज भरताना आपला आधार नंबर टाकला होता, पण सेतू केंद्रातील थम्ब मशीनमधील बिघाडामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते. आता नव्याने अर्ज भरताना आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नंबरवरुन आधीच अर्ज भरलेला आहे, असा संदेश येऊन त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. या समस्येने त्रस्त झालेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.