शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३०० किमीचे रस्ते खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:16 IST

गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण २ हजार १५० किमी रस्ते आहेत.

ठळक मुद्दे३५ टक्के काम पूर्ण : प्रजिमा व राज्य महामार्गाची स्थिती

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण २ हजार १५० किमी रस्ते आहेत. त्यापैकी सुमारे १ हजार ३०० किमी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळा संपताच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. जास्त पावसामुळे व पुराचे पाणी दोन ते तीन दिवस वाहत राहिल्यास डांबरी रस्त्यांवरील डांबर निघून त्यावर खड्डे पडतात. डांबरी रस्त्यांची ही सर्वात मोठी कमजोरी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग आहेत. ग्रामीण नागरिकांकडूनही डांबरी रस्ता बांधण्याची मागणी होत असल्याने एकूण रस्त्यांपैकी बहुतांश रस्ते डांबराचे आहेत.पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या पाहणीस सुरूवात केली. त्यावेळी एकूण रस्त्यांपैकी सुमारे १ हजार ३०० किमीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणचे डांबर पूर्णपणे उखडून गेले असल्याचे दिसून आले. राज्य शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात ८५ युनिट खड्डे बुजविण्याचे काम करीत असून आजपर्यंत खड्डे बुजविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त गडचिरोली जिल्हा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.११ कोटी रूपये निधीची मागणीसार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाकडे १० कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी ५ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधी सुध्दा लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१७५ किमी रस्त्यांचे नूतनीकरणसार्वजनिक बांधकाम विभागाने १७५ किमी रस्त्यांचे नूतनीकरण करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. जारावंडी-कसनसूर, गोमणी, घोट, कोरची-छत्तीसगड राज्य सीमा, गडचिरोली-चांदाळा, कुरखेडा-कढोली, मौशीखांब-वडधा, शंकरपूर-गोंदिया सीमा, परसवाडी-कुराडी, भेंडाळा-गणपूर, गडचिरोली-ठाकरी, अहेरी-महागाव या मार्गांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. सद्य:स्थितीत खड्डे बुजविण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने निधीची टंचाई नाही. काम वेळेच्या आत व्हावे यासाठी सुमारे ८५ युनिट जिल्हाभरात खड्डे बुजविण्याचे काम करीत आहेत.- प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता, साबांवि गडचिरोली