शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१३ आदिवासीबहूल गावे न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 6, 2014 22:55 IST

अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा,

चामोर्शी : अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल एलावार यांनी राज्यपालांकडे केली आहे. चामोर्शी तालुक्यातील वागदरा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल एलावार यांनी १२ आॅगस्ट २०१४ ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांच्याकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली. त्यांतर्गत चामोर्शी तालुक्यातील १३ गावातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त असूनही या गावांचा समावेश आदिवासी उपयोजनेत करण्यात आलेला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र चामोर्शी तालुक्यातील ५, आरमोरी तालुक्यातील ३, वडसा तालुक्यातील २ व धानोरा, मुलचेरा तालुक्यातील प्रत्येकी १ गाव ज्यामध्ये एकही अनुसूचित जमातीची लोकसंख्या नसताना त्या गावाचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. चामोर्शी तालुक्यातील आदिवासी उपयोजनेत समावेश असलेल्या ११९ पैकी ३८ गावातच ५० टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या अनुसूचित जमाती असल्याचे या माहितीवरून दिसून आले आहे. शासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी पेसा कायदा लागू केला. मात्र या गावात आदिवासींची लोकसंख्या आहे. त्या भागातील लोक आदिवासींच्या योजनांपासून ते वंचित आहे, असेही एलावार यांनी राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)