शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१३ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:26 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जिल्हाभरात एकूण १० लाख १० हजार ३५८ क्विंटलची धान खरेदी ८६ केंद्रांवरून करण्यात आली.

ठळक मुद्देखरीप हंगाम संपला : आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी १० लाख क्विंटलवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जिल्हाभरात एकूण १० लाख १० हजार ३५८ क्विंटलची धान खरेदी ८६ केंद्रांवरून करण्यात आली. सदर धान खरेदी पोटी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १६३ कोटी ७७ लाखाचे धान चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही २ हजार ४०२ शेतकऱ्यांचे १३ कोटी ४ लाख १९ हजार रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत.आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्रांवरून यंदाच्या खरीप हंगामात १२७ कोटी ३८ लाख २६ हजार रूपये किमतीच्या एकूण ७ लाख २७ हजार ९०० क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. एकूण २५ हजार ३१९ शेतकºयांनी गडचिरोली कार्यालयाच्या हद्दीतील ५१ केंद्रांवर धानाची विक्री केली. यापैकी २४ हजार ५४६ शेतकºयांना १२३ कोटी २६ लाख ३८ हजार रूपयांचे धान चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ७७३ शेतकºयांचे ४ कोटी ११ लाख ८८ हजार रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत.अहेरी कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ३५ केंद्रांवर आविका संस्थांमार्फत धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी उपविभागात एकूण ४९ कोटी ४३ लाख रूपये किमतीच्या २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. यापैकी ४० कोटी ५० लाख रूपयांचे धान चुकारे संबंधित शेतकºयांना अदा करण्यात आले. अद्यापही १ हजार ६२९ शेतकºयांचे ८ कोटी ९२ लाख ३१ लाख रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० केंद्रांवरून २७ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपये किमतीच्या १ लाख ५७ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १३ केंद्रांवरून १ लाख ७२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत ३० कोटी १० लाख ३३ हजार रूपये आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ केंद्रांवरून एकूण १ लाख ५४ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची किंमत २७ कोटी १० लाख रूपये आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ केंद्रांवरून १ लाख १० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० केंद्रांवरून १ लाख ३२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.मागील हंगामाच्या तुलनेत धान खरेदी वाढलीयंदाच्या तुलनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धानाची आवक कमी झाली. मात्र यंदाच्या हंगामात धानाचे उत्पादन बºयापैकी झाले. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी यंदाच्या हंगामात जवळपास दोन ते अडीच लाख क्विंटलने वाढली.मध्यंतरीच्या काळात आविका संस्थांच्या अनेक केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी त्यावेळी बºयाच केंद्रावरची धान खरेदी प्रभावित झाली. मात्र त्यानंतर महामंडळाने आवश्यक त्या केंद्रावर बारदान्याचा पुरवठा केला. मार्च व एप्रिल महिन्यात केंद्रांवर धानाची आवक वाढली होती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड