शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१३९८ गावांमध्ये दुष्काळ

By admin | Updated: January 3, 2016 01:55 IST

गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे.

अंतिम पैसेवारी जाहीर : विभागीय आयुक्तांना अहवाल सादर; सिरोंचा तालुक्यात सुस्थितीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. तर १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून शासन कोणत्या उपाययोजना करते. याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे २ लाख हेक्टरवर धान पिकासह विविध पिकाची लागवड करण्यात येते. यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येते. धान पिकासासाठी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र यावर्षी सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यातही बराचसा पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे हजारो हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान पीक लावले होते. सदर पीक पाण्याअभावी करपले. उशीरा रोवलेल्या धानावर विविध रोगांनी हल्ला केल्यानेही धानाचे उत्पादन घटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ६१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक, सुधारित, अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. अंतिम पैसेवारीवरूनच शासन संबंधित गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना जाहीर करते. त्यामुळे अंतिम पैसेवारीला महत्त्व आहे. जिल्हाभरातील १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे महसूल प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.४३ एवढी आहे. सिरोंचा वगळून सर्वच तालुक्यांची सरासरी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)ज्या गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे, अशा गावांमध्ये शासनाच्या वतीने दुष्काळ घोषीत केला जाते. या गावांसाठी पाणी टंचाई निवारण, रोहयो काम, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदींमध्ये विशेष प्राधान्य दिली जाते. या सर्व बाबी शासन आराखडा तयार करून वितरित करते. जिल्हाभरातील जवळपास ९० टक्के गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन या गावांमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची उपाययोजना करणार आहे. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. टंचाई निवारणासाठी केंद्रानेही तीन हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याचाही फायदा ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार आहे.