शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

१२६ गावांना सिंगल फेजने वीज पुरवठा

By admin | Updated: November 24, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६६८ गावे आहेत. यातील शेकडो गावांना अजूनपर्यंत वीज पुरवठा झाला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या घरात अजूनही विजेचा प्रकाश पडला नसून मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. १० वर्षांपूर्वी गावाची लोकसंख्या कमी असल्याने विद्युत विभागाने जवळपास २०० गावे सिंगल फेजने जोडून विद्युत पुरवठा केला होता. १० वर्षांपूर्वी विजेचा वापर अत्यंत कमी होत असल्याने सिंगल फेजनेही काम चालत होता. मात्र केंद्र शासनाने राजीव गांधी योजनेंतर्गत बीपीएलधारकांना १५ रूपयात वीज जोडणी देण्याची योजना आणली. या योजनेमुळे प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे वीज वापरकर्त्यांची संख्या आपोआप वाढली. त्याचबरोबर आज प्रत्येक घरात टीव्ही, पंखा, कुलरचा वापर केला जातो. काही नागरिकांच्या घरी फ्रिजही आढळून येते. विजेवर चालणारी साधणे वाढल्यानेही विजेचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी होत असून बहुतांश वेळा घरातील विद्युत साधणे सुरूच होत नसल्याची तक्रार सिंगल फेज असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही १२६ गावांमध्ये सिंगल फेजनेच पुरवठा केला जात आहे. विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन थ्री-फेज वीज जोडणी करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या चार तालुक्यांमधील सर्वाधिक गावांमध्ये सिंगल फेजने विद्युत पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून विहीर बांधून दिली आहे. त्याच्यावर अनुदानातूनच कृषीपंपही उपलब्ध करून दिले आहे. मात्र गावामध्ये सिंगल फेजचा वीज पुरवठा असल्याने सदर कृषिपंप सुरूच होत नसल्याने विहीर व कृषिपंप बेकामी पडून आहे. मागील काही दिवसांमध्ये सिंगल फेजचा पुरवठा थ्री-फेजमध्ये बदलविण्याचे धोरण विद्युत कंपनीने सुरू केले आहे. मात्र थ्री-फेजमध्ये बदलविण्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. याकडे विद्युत विभागाने लक्ष घालून सर्वच सिंगल फेज गावांमध्ये थ्री-फेजने विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)