शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

१२६ शिक्षक अतिरिक्त

By admin | Updated: August 19, 2016 00:48 IST

खासगी शैक्षणिक संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण....

खासगी संस्थांच्या शाळा : आॅनलाईन पद्धतीने मागविली होती माहिती गडचिरोली : खासगी शैक्षणिक संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे. यामध्ये जिल्हाभरातील १२६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांत शासनाने गल्लोगल्ली शाळांना मान्यता दिली आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी संस्थांच्या शाळासुद्धा उघडण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागामध्येही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. एकंदरीतच शाळांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्या तुलनेत मागील काही दिवसांपासून लोकसंख्या स्थिर आहे. शासनाच्या शाळांच्या तुलनेत पालकवर्ग इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य देत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे शासनाच्या शाळांची पटसंख्या घटून तुकड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये ५०० पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हीच परिस्थिती खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थांचीसुद्धा झाली आहे. या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत, अशा शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शासनाने माहिती मागितली होती. ही सर्व माहिती आॅनलाईन पद्धतीने मागितली होती. त्यासाठी शासनाने ‘समायोजन पोर्टल’ निर्माण केले होते. अतिरिक्त शिक्षकांची माहिती संबंधित संस्थांनी समायोजन पोर्टलवर भरायची होती. गडचिरोली जिल्ह्यात खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक अनुदानित १४६ शाळा आहेत. या शाळांमधील ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर प्राथमिक शाळांमधील ११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्हाभरात खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या ३१ प्राथमिक शाळा आहेत. या शिक्षकांकडून २० आॅगस्टपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. या आक्षेपानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २२ आॅगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २४ व २५ आॅगस्ट रोजी समायोजन केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी) पाच संस्थांनी माहितीच भरली नाही मंजूर पदे व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती आॅनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर देण्यात आली होती. मात्र जिल्हाभरातील पाच संस्थांनी स्वत:हून माहिती भरली नाही. काही संस्थांमधील व्यवस्थापनात भांडणे आहेत. त्यामुळे या संस्थांनी माहिती भरली नाही. अशा संस्थांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत:च्या लॉगईनवरून भरली आहे. २४ व २५ आॅगस्टला समायोजन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे २४ व २५ आॅगस्ट रोजी समायोजन केले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन राहणार आहे. पहिल्या फेरीत सदर शिक्षकांचे सेवा ज्येष्ठतेनुसार संबंधित जिल्ह्यातच समायोजन केले जाणार आहे. पहिल्या फेरीत ज्या शिक्षकांचे समायोजन झाले नाही, अशा शिक्षकांचे दुसऱ्या फेरीत समायोजन केले जाणार आहे. दुसऱ्या फेरीतही ज्या शिक्षकांचे समायोजन होणार नाही, त्यांच्यासाठी तिसरी फेरी राबविली जाणार आहे. माध्यमिकमध्ये केवळ १५ जागा रिक्त खासगी संस्थांच्या मार्फतीने सर्वाधिक माध्यमिक शाळा चालविल्या जातात. जिल्हाभरात एकूण १४६ शाळा आहेत. यामधील ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर केवळ १५ जागा जिल्हाभरात शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित १०० शिक्षकांचे विभागीय स्तरावरील इतर जिल्ह्यांमध्ये समायोजन करावे लागणार आहे. विभागीय स्तरावरही समायोजन न झाल्यास राज्यस्तरावर समायोजन केले जाणार आहे. रिक्त जागा कमी व अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक, अशी परिस्थिती राज्यभरातच आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे नेमके समायोजन करायचे कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. मागील वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यभरातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या शिक्षकांना काम न करताच कोट्यवधी रूपये वेतन देण्याची पाळी शासनावर आली आहे.