शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जनमैत्री मेळाव्यात १,२५० नागरिकांचा सहभाग

By admin | Updated: October 16, 2016 01:00 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी ५ ते ११ आॅक्टोबर दरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व बंद पुकारला होता.

नक्षल सप्ताहाला टक्कर : नऊ उपविभागीय स्तरावर कार्यक्रम, शेतीबाबत माहिती, आरोग्य तपासणी व विविध क्रीडा स्पर्धागडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी ५ ते ११ आॅक्टोबर दरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व बंद पुकारला होता. मात्र गडचिरोली पोलिसांनीसुध्दा खबरदारी आणि सतर्कता म्हणून विशेष रणनीती आखली. या कालावधित पोलिसांनी आदिवासी बांधवांसाठी ‘जनमैत्री’ मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे नक्षलवाद्यांचा हा सप्ताह पूर्णपणे ‘फ्लॉप-शो’ ठरला. गडचिरोली जिल्ह्यात ९ उपविभागीय स्तरावर पोलिसांच्या वतीने तीन दिवसीय निवासी जनमैत्री मेळावे घेण्यात आले. यात अतिदुर्गम भागातील १ हजार २५६ आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला.पोलिसांच्या आक्रमकतेमुळे जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांना हिंसक प्रकार घडवून आणता आले नव्हते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात ५ ते ११ आॅक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व बंदचे आवाहन केले होते. नक्षलवाद्यांच्या आवाहनाला आता स्थानिकांचा प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. तरीसुध्दा स्थानिकांच्या मदतीने शासनाच्या विरोधात प्रचार, प्रसार, विध्वंसक घटना, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी प्रकार नक्षलवाद्यांकडून केले जातात. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी अभिनव रणनीती आखली. स्थानिक पातळीवरील एआरडी, जीआरडी, मिलीशिया यांना एकत्र आणून पोलिसांनी त्यांच्यासाठी ८ ते १० आॅक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी जनमैत्री मेळावे घेतले. विशेष म्हणजे आतापर्यंत जी मंडळी या सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांची पत्रके गावागावात वाटत होती, ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. गडचिरोलीतील जनमैत्री मेळाव्यात ९० आदिवासी बांधव, कुरखेडा येथे १६४, पेंढरी १५७, धानोरा १३५, एटापल्ली १६०, जिमलगट्टा १४५, भामरागड १६०, सिरोंचा ११० आणि अहेरी येथील जनमैत्री मेळाव्यात १३५ अशा एकूण १,२५६ नागरिकांचा समावेश होता. मेळाव्यात सहभागी ग्रामस्थांकरीता सकाळी योगा व प्राणायामचे विशेष वर्ग घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आरोग्य व परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सोबतच नागरिकांना शेतीविषयक समस्या व त्याचे निराकरण, महसूल विषयक माहिती, पेसा कायदासंदर्भात मार्गदर्शन व ग्रामसभेच्या अधिकाराबाबत माहिती देण्यात आली. कबड्डी व व्हॉलीबॉल यासारख्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यात सहभागी झालेल्या नागरिकांकडून आपापल्या परिसरात विकासासाठी काय करायला पाहिजे, शेतीविषयक उत्पादन, धानाची परिस्थिती यावरसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात प्रधानमंत्री विमा योजना, बँक खाते उघडणे, विमा काढणे, आर्थिक समृद्धीसाठी स्थानिक वनोपजांचा उपयोग, तेंदूपत्ता कटाई, बांबू कटाई, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पथनाट्य, रेला नृत्य व आदिवासी संस्कृतीवर आधारित चित्रपटही दाखविण्यात आले.