शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२५ कामे अपूर्ण

By admin | Updated: October 24, 2015 01:11 IST

मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १२ तालुक्यात एकूण ६९४ कामे मंजूर करण्यात आली.

बीआरजीएफ : कामे पूर्ण करण्याची ३१ डिसेंबर अंतिम डेडलाईनगडचिरोली : मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १२ तालुक्यात एकूण ६९४ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ४०९ कामे पूर्ण झाली असून १२५ कामे अपूर्ण स्थितीत आहे. केंद्र सरकारने बीआरजीएफ योजना गुंडाळली असून या योजनेंतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. जिल्ह्यात बीआरजीएफच्या कामात गती नसल्याने १२५ अपूर्ण कामांपैकी मुदत संपेपर्यंत अर्धेअधिक कामे अपूर्ण राहण्याची शक्यता बळावली आहे.बीआरजीएफची अहेरी तालुक्यात ४० ग्राम पंचायतींमध्ये एकूण ७८ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी १२ कामे पूर्ण झाली असून पाच कामे अपूर्ण आहेत. आरमोरी तालुक्यात ३४ ग्राम पंचायतींमध्ये ७६ मंजूर कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली असून सात कामे अपूर्ण आहेत. भामरागड तालुक्यात मंजूर २१ कामांपैकी ९ कामे पूर्ण झाली असून तीन कामे अपूर्ण आहेत. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १०० कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ७१ कामे पूर्ण झाली असून १९ कामे अपूर्ण स्थितीत आहेत. देसाईगंज तालुक्यात मंजूर ३० कामांपैकी २२ कामे पूर्ण झाली असून पाच कामे अपूर्ण आहेत. धानोरा तालुक्यात मंजूर ८० कामांपैकी ४९ कामे पूर्ण झाली असून १८ कामे अपूर्ण आहेत. एटापल्ली तालुक्यात मंजूर ४६ कामांपैकी २७ कामे पूर्ण झाली असून १६ कामे अपूर्ण आहेत. एटापल्ली तालुक्यातील ३२ ग्राम पंचायतीमध्ये ४६ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी २७ कामे पूर्ण झाली असून १६ कामे अपूर्ण आहेत. गडचिरोली तालुक्यात ५१ ग्राम पंचायतीमध्ये एकूण ७९ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ५२ कामे पूर्ण झाली असून १५ कामे अपूर्ण आहेत. कोरची तालुक्यात ३० ग्राम पंचायतीमध्ये मंजूर ३८ कामांपैकी ३३ कामे पूर्ण झाली असून २ कामे अपूर्ण आहेत. कुरखेडा तालुक्यात मंजूर ७० कामांपैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १९ कामे अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात मंजूर ३२ कामांपैकी २३ कामे पूर्ण असून ८ कामे अपूर्ण आहेत. सिरोंचा तालुक्यात ४१ ग्राम पंचायतीमध्ये ४४ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ६ कामे पूर्ण झाली असून ८ कामे अपूर्ण आहेत. ग्रा. पं. ने काम पूर्ण करण्यासाठी हालचाली वाढविले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)इतर योजनेतून कामे घेतल्याने १६० कामे रद्दमागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत २०१४-१५ या वर्षात एकूण ६९४ कामे ग्राम पंचायतस्तरावर मंजूर करण्यात आली. यापैकी १६० कामे ग्राम पंचायतस्तरावर विविध योजनेतून यापूर्वीच घेण्यात आल्यामुळे बीआरजीएफची १६० कामे रद्द करण्यात आली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात ६१, आरमोरी ११, भामरागड ९, चामोर्शी १०, देसाईगंज ३, धानोरा १३, एटापल्ली ३, गडचिरोली १२, कोरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा १ व सिरोंचा तालुक्यातील सर्वाधिक ३० कामांचा समावेश आहे.