शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आणखी मिळणार १२५ सौर कृषिपंप

By admin | Updated: July 22, 2015 02:23 IST

केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले ...

केंद्र शासनाची योजना : वीज कंपनी करणार सहकार्यगडचिरोली : केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले असून त्यासाठी लवकरच अर्जांची मागणी केली जाणार आहे. यापूर्वीही नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ सौर कृषिपंप बसविण्यात आले असून सदर कृषीपंप सुरू सुध्दा झाले आहेत. औष्णीक वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदुषण होत असून याचे परिणाम संपूर्ण सजीव जातीला भोगावे लागत आहे. त्याचबरोबर भविष्यात कोळशाची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र शासनाने संपूर्ण अपांरपरिक ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाने एक लाख सौर कृषिपंप मंजूर केले असून त्यासाठी सुमारे ४०० कोटी रूपये आरक्षित केले आहेत. महाराष्ट्र राज्याला ७ हजार ५४० नग सौर कृषीपंप मंजूर केले आहेत. योजनेच्या निकषानुसार या योजनेचा लाभ देण्यासाठी अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली व वर्धा या आत्महत्याग्रस्त व आदिवासी बहूल जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी १२५ सौर कृषिपंप मंजूर झाले आहेत. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून अर्जांची मागणी लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर असणे गरजेचे आहे. शेतकरी हा अतिदुर्गम भागातील असावा, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण झालेले नसावे, वन विभागाचा अडथळा नसावा, पाच एकर पेक्षा अधिक शेती असू नये, लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषिपंप आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. (नगर प्रतिनिधी)महावितरण भरणार कर्जकृषिपंपासाठी केंद्र शासन ३० टक्के अनुदान देणार आहे. पाच टक्के अनुदान राज्य शासन भरणार आहे. पाच टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरायचा आहे. तर उर्वरित ६० टक्के रक्कम लाभार्थ्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार आहे. महावितरण टप्प्याटप्प्याने कर्जाची परतफेड करणार आहे. ३ ते ७.५ अश्वशक्तीचे मिळणार पंपया योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती एसी, तीन अश्वशक्ती डीसी, पाच अश्वशक्ती एसी, पाच अश्वशक्ती डीसी, ७.५ अश्वशक्ती एसी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे.