आरमोरी : तालुक्यातील वडेगाव जवळ असलेल्या मेंढा येथील जिल्हा परिषदेची शाळा मंगळवारी दुपारी १२ वाजताच बंद असल्याचे दिसून आले.पंचायत समितीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार, पं.स. सदस्य इंदिरा मोहुर्ले, विस्तार अधिकारी कन्नाके, टेंभुर्णे, जाधव यांनी या शाळेला भेट दिली. दुपारी १२ वाजता शाळेला कुलूप लागलेले होते. शाळेच्या दोन्ही शिक्षिका बाहेरगावी लग्नाला गेल्या आहेत, अशी माहिती या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिली. केंद्र प्रमुख शाळांना भेटी देत नाही. त्यामुळे असे प्रकार होत आहे, असे गावकऱ्यांनी वडपल्लीवार यांना सांगितले. याबाबत सीईओंकडे तक्रार करणार असल्याचे वडपल्लीवार यांनी सांगीतले.कंपाउंडरकडून रुग्ण तपासणीपिसेवडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर दोन दिवसांपासून सुटीवर गेलेले आढळले. येथे आलेल्या रूग्णांची तपासणी कंपाउंडरच करीत होता व तो रूग्णांना इंजेक्शनही देत असल्याचे पं.स. पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान दिसून आले. डॉक्टरांची खुर्ची रिकामी पडलेली होती. कंपाउंडरच पूर्णवेळ डॉक्टरच्या भूमीकेत दिसून आल्याचे वास्तव पुढे आले.
मेंढाची शाळा १२ लाच झाली बंद
By admin | Updated: March 13, 2015 00:06 IST