शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

१.१८ लाख शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:38 IST

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.

ठळक मुद्देचामोर्शी तालुक्यात सर्वाधिक लाभ : ६८ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लाभ तातडीने शेतकºयांना मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देऊन पात्र शेतकºयांची यादी काढण्यात आली. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेचे भिजत घोंगडे आणि त्यामुळे ओढवून घेतलेली शेतकºयांची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने ही योजना अंमलात आणण्यात आली. महिन्याला ५०० रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६ हजार रुपये शेतकºयांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे वर्षातून ३ टप्प्यात ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. १ फेब्रुवारी २०१९ पासून लागू झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चक्क मे महिन्यापर्यंतची रक्कम अग्रिम स्वरूपात शेतकºयांना मिळत आहे. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकºयांना लाभ मिळणार आहे.१५७५ गावांची माहिती पोर्टलवर अपलोडजिल्ह्यातील १६८० गावांपैकी १५७५ गावांमधील शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यात ६८ हजार १०६ पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली. यात संबंधित यंत्रणेने सोमवारपर्यंत ९७.७४ टक्के उद्दीष्ट गाठले होते. विशेष म्हणजे गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कोरची, अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा या ८ तालुक्यांच्या शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे उद्दीष्ट १०० टक्के गाठण्यात यंत्रणेला यश आले आहे.