शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्टर कार्यालयात ११७ पदे रिक्त

By admin | Updated: August 26, 2014 23:28 IST

जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्या कार्यालयातून चालविला जातो. तो कार्यालयसुद्धा अपवाद राहिले नसून

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्या कार्यालयातून चालविला जातो. तो कार्यालयसुद्धा अपवाद राहिले नसून या कार्यालयामध्ये मंजूर असलेल्या ९७५ पदांपैकी सुमारे ११७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या सामान्य नागरिकांचे काम वेळेवर होत नसल्याने त्याला आल्या पावली परत जावे लागते. नक्षलग्रस्त व अविकसीत असल्यामुळेच या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी वर्ग येण्यास तयार होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्याबरोबर मंत्रालयामध्ये आपले वजन वापरून सदर बदली रद्द केल्या जाते. तर दुसरीकडे या जिल्ह्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी त्याची बदली करण्यास नेहमी धडपडतो. जाणारे जाण्यासाठी तयार असतात. मात्र येणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सिंचाई विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांच्यासह राज्य शासनाच्या इतरही विभागांमध्ये जवळपास २५ टक्के पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा याला अपवाद ठरलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ ची ३४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे भरण्यात आली असून १२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी सुमारे ३५.२९ टक्के एवढी आहे. गट ब ची ७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६७ पदे भरण्यात आली असून १० पदे रिक्त आहेत. टक्केवारीचे प्रमाण १२.९९ टक्के एवढे आहे. गट क च्या ७११ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६२१ पदे भरली आहेत. ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचे प्रमाण १२.६६ टक्के एवढे आहे. गट ड चे १५३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १४८ पदे भरण्यात आली आहेत. तर ५ पदे रिक्त आहेत. टक्केवारीचे प्रमाण ३.२७ टक्के एवढे आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने शेकडो विकासाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अगदी सामान्य व्यक्तीलाही काम पडते. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्य येतात. मात्र येथील पदे रिक्त असल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागते. महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनही अधिकारी वर्ग गडचिरोली जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही. रिक्त पदांकडे एक नजर टाकल्यास सर्वाधिक रिक्त पदे अधिकारी वर्गाची असल्याचे दिसून येते. प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे निर्णय अधिकारी वर्गाकडून घेतले जातात. मात्र अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ठोस निर्णय घेतले न जाता फाईल त्याच ठिकाणी पडून राहते. त्यामुळे अनेक अधिकारी राज्याच्या इतर भागात लाचखोरी तसेच अन्य प्रकरणात पकडल्या गेल्यावर कारवाई झाल्यावर शिक्षा म्हणून येथे पाठविले जातात. ते त्याच मानसिकतेत काम करतात. याचा परिणाम विकास प्रक्रियेवर प्रकर्षाने होत आहे. यापूर्वीच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत थेट राज्य सरकारकडेच तक्रार केली होती. मात्र त्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही. रिक्त पदे भरले नाही व तसे अधिकारी पाठविणे अद्याप सुरूच आहे. (नगर प्रतिनिधी)