शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात १,१३७ युवकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:58 IST

दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाभरातील बेरोजगारांची गर्दी : नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्राचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : दिन दयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला जिल्हाभरातील १ हजार १३७ बेरोजगार युवकांनी उपस्थिती दर्शवून रोजगारासाठी नोंदणी केली.रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक पी. एम. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, उद्योग उभारून तो यशस्वी करण्यासाठी सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे. उद्योग उभारणीसाठी प्रशासकीय यंत्रणा आर्थिक मदत करेल. योग्य ते मार्गदर्शन करेल. मात्र व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संबंधित व्यक्तीलाच स्वत: प्रयत्न करावे लागेल. रोजगारासाठी गाव व जिल्हा सोडण्याची तयारी युवकांनी केली पाहिजे. वाढलेल्या स्पर्धेत चिकाटी व मेहनतीशिवाय उद्योग यशस्वी होणार नाही. अनेक प्रकारचे उद्योग व व्यवसाय करता येतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या व्यवसायात आपल्याला आवड व कौशल्यप्राप्त आहेत. त्या व्यवसायाचीच निवड करावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोद भोसले यांनी मुद्रा योजनेबाबत माहिती दिली.प्रास्ताविक मुख्याधिकारी कृष्णा निपाने, संचालन प्रमोद भानारकर तर आभार घोसे यांनी मानले. सदर मेळावा कौशल्य विकासचे व्यवस्थापक गणेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी छगण काळबांधे, दिनेश धोटे, संजय बोलुवार, अशोक गेडाम, मनिष खोब्रागडे, संतोष करपे, गणेश नाईक यांनी सहकार्य केले.२९ संस्थांचे स्टॉलरोजगार मेळाव्यादरम्यान रोजगार देणाऱ्या सात संस्था, विविध प्रकारची आठ महामंडळे, पाच बँका, कौशल्य विकास प्रशिक्षण देणाºया सहा संस्था व तीन विमा कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. युवकांच्या शिक्षण व प्रशिक्षणानुसार नोंदणी करून करण्यात आली.