शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू

By admin | Updated: July 26, 2016 01:21 IST

धानोरा तालुक्यातील दुर्गम गाव चव्हेला येथे आत्याकडे राहून पाचव्या वर्गात जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय बालिकेला सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला

धानोरात उपचार झाला नाही : रेफर करताना वाटेतच सोडला प्राणधानोरा : धानोरा तालुक्यातील दुर्गम गाव चव्हेला येथे आत्याकडे राहून पाचव्या वर्गात जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय बालिकेला सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर नातेवाईकांनी सकाळी धानोरा रुग्णालय गाठले. मात्र बालिकेवर उपचार न झाल्याने तिला गडचिरोलीच्या रुग्णालयात रेफर करताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १० वाजताच्या सुमारास घडली.रेखा अवसू नरोटे (११) रा. दराची असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. रेखा नरोटे ही धानोरा तालुक्यातील दराची गावापासून ८ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथे आपल्या आत्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचव्या वर्गात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणेच ती खाटेवर रविवारच्या रात्री झोपी गेली. परंतु सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास विषारी सापाने रेखा हिला दंश केला. त्यानंतर सदर बाब कुटुुंबीयांच्या लक्षात आली. मात्र रेखा ही सुस्थितीत असल्यामुळे त्यानंतर सकाळी कुटुंबीयांनी रेखाला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ वाजता डॉक्टर हजर नव्हते. रेखाची प्रकृती अधिकच खालावत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी ग्रामीण रूग्णालयाच्या वाहनाने गडचिरोली येथील रुग्णालयात रेफर करण्याचे ठरविले. त्यानंतर गडचिरोलीकडे वाहनाने रेखाला घेऊन येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. धानोरा ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपचार झाला असता तर रेखाचा जीव वाचला असता. (तालुका प्रतिनिधी)