रॅलीद्वारे जनजागृती : अहेरीत जागतिक रक्तदाता दिनअहेरी : जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त मंगळवारी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात एका नगरसेवक दाम्पत्यासह ११ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. रक्तदाता दिवसानिमित्त मंगळवारी अहेरी शहरात रॅली काढून रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात आली. या रॅलीला अहेरी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ११ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये नगरसेवक शैलेंद्र पटवर्धन, ममता शैलेंद्र पटवर्धन, लोकमत सखीमंचच्या अहेरी तालुका संयोजिका पूर्वा दोंतुलवार, हेल्पींग हॅन्डचे प्रतीक मुधोळकर, ललित गिरोले, विजय पोरेड्डीवार, नितीन बिट्टीवार, मेहराज शेख, संतोष कावळे, इरफान खान पठाण, हर्षद पोलोजवार आदींचा समावेश आहे. याप्रसंगी डॉ. कन्ना मडावी यांनी रक्तदानाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रक्तपेढीच्या मुख्य तंत्रज्ञ सरिता वाघ, शिरीन कुरेशी, शरद बांबोळे, शंकर मगडीवार, रोमीत तोंबर्लावार, दिनेश येनगंट्टीवार, गणेश डोके उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगरसेवक दाम्पत्यासह ११ जणांनी केले स्वच्छेने रक्तदान
By admin | Updated: June 15, 2016 02:06 IST