शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 10:56 IST

आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.

ठळक मुद्दे यावर्षी १४० गावांचा पुढाकार नक्षलवादाने भ्रमनिरास झालेल्यांना हवा विकास

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षल चळवळ गावकºयांच्या सहकार्याशिवाय टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे गावकºयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद्यांपासून दूर करून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांमार्फत गेल्या १४ वर्षांपासून नक्षल गावबंदी योजना राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.गडचिरोली जिल्ह्यात १९८० पासून नक्षल चळवळ स्थिरावल्यानंतर विकास कामांच्या गतीवर परिणाम झाला. दुष्काळाच्या परिस्थितीतही नक्षलवादी सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून शासकीय विकास कामांना विरोध करण्यास भाग पाडत होते. यावर उपाय म्हणून सन २००३ पासून शासनाकडून नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली. ही योजना अंमलात आल्यामुळे नक्षलवाद्यांकडून विविध गावांमध्ये होणाºया नुकसानीच्या घटनांची माहिती शासनाला प्राप्त होऊन नक्षल चळवळीला लगाम बसत आहे.नक्षलवाद्यांच्या दहशतीला झुगारून शासनावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल संबंधित गावाला प्रोत्साहन म्हणून शासनाच्या वतीने ३ लक्ष रूपये देण्यात येतात. आतापर्यंत असा ठराव घेतलेल्या १०३६ गावांचे प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी शासनाकडून ८७० गावांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. १४६ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.गावबंदी केलेल्या गावात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारच्या सोयी करण्यात येतात. त्यामुळे गावकºयांना या गावबंदीत आपले हित असल्याचे लक्षात येत आहे.काय आहे नक्षल गावबंदी?नक्षल गावबंदीच्या ठरावात गावकरी पुढील निर्णय घेतात. त्यात नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, नक्षल सभेत जाणार नाही, गावातील मुलामुलींना नक्षल दलममध्ये जाऊ देणार नाही, गावात नक्षल संघटना स्थापन होऊ देणार नाही, शासनाच्या प्रत्येक विकास कामात सर्व गावकरी मदत करणार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना संघटीतपणे प्रतिकार करणार अशा मुद्द्यांचा या ठरावात समावेश असतो.गोंदिया व चंद्रपूरमध्येही गावबंदीसाठी पुढाकारच्या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २००३ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ७३ गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली असून ४० प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत.च्चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ८० गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली. त्यापैकी ४६ प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत. उर्वरीत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.लोकांची दिशाभूल करून बंदुकीच्या धाकावर नक्षल्यांनी आतापर्यंत गावांचा विकास होऊ दिला नाही. मात्र हे आता गावकºयांच्या लक्षात आले आहे. उर्वरित गावकºयांनीही गावबंदी योजनेचा लाभ घेऊन नक्षल्यांना गावबंदी करून गावाचा विकास करावा.- शरद शेलार, विशेष पोलीस महानिरीक्षकनक्षल विरोधी अभियान