शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गडचिरोलीतील १०३ हेल्पलाईन बंदच

By admin | Updated: November 25, 2015 03:58 IST

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ हेल्पलाईन जिल्हा पातळीवर पोलीस विभागात

गडचिरोली : महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ हेल्पलाईन जिल्हा पातळीवर पोलीस विभागात सुरू केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील हेल्पलाईन बंद असल्याचे दिसून आले आहे. २५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. ही हेल्पलाईन सुरू आहे किंवा नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती नसल्याचे त्यांच्याशी संपर्क साधल्यावर लक्षात आले. देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात ६० बलात्काराच्या घटना घडल्या. ५६ छेडछाडीच्या घटनाही घडल्या. प्रवासादरम्यान वा अन्यत्र ठिकाणी संकटात असलेल्या महिलांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने १०३ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली मात्र जिल्हा पोलीस मुख्यालयात या हेल्पलाईनवर काहीही प्रतिसाद मिळत नाही. ही हेल्पलाईन पूर्णत: बंद असल्याचे दिसून येत आहे. ही हेल्पलाईन बंद असल्याचे लक्षात आल्यावर लोकमत प्रतिनिधीने रविवारी रात्री ७ वाजता १०० क्रमांकाच्या पोलीस मुख्यालयातील कक्षाला संपर्क केला. त्या महिला कर्मचाऱ्याने १०३ हा नगर पालिकेशी संबंधित नंबर असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा १०३ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला असता सदर क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती गडचिरोली पोलीस मुख्यालयात करण्यात आली नाही, असे यावरून दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या प्रकरणात तक्रारी नोंदविण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्येच जावे लागते व तेथे तक्रार दाखल करावी लागते, असे दिसून येते व या हेल्पलाईनविषयी महिलांमध्येही जिल्हाभर कुठेही जनजागृती करण्यात आलेली नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचारासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आले होते. परंतु शाळकरी व महाविद्यालयीन मुलींनाही फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात ही हेल्पलाईन बंद असल्याने अद्याप एकही तक्रार यावर नोंदविण्यात आली नाही, हे स्पष्ट झाले. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.महिलांवरील अत्याचाराबाबत विशेष हेल्पलाईन असल्याची आपल्याला माहिती नाही. अशी घटना घडली तर आपण पालक, शिक्षक किंवा वडील बंधू यांना माहिती देतो. त्यानंतर तेच काय ते निर्णय घेतात, अशी घटना आपल्याबाबत अद्याप तरी घडलेली नाही. - मीनाक्षी मेश्राम, विद्यार्थिनी आरमोरीस्थानिक पोलीस ठाण्याला याबाबत अनेकदा माहिती दिली जाते. गावात अशा घटना घडल्या तर गावपुढारी, पोलीस पाटील पुढाकार घेऊन या तक्रारींचा निपटारा करतात. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यास याबाबत पोलिसांचीही मदत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी कायदेविषयक शिबिर शाळेमध्ये झाले तेव्हा काही माहिती देण्यात आली होती.- अर्चना मांडवकर, विद्यार्थिनी१०३ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे किंवा नाही हे आपल्याला निश्चित माहित नाही. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नुकतेच गडचिरोली येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात राज्य महिला आयोगाच्या सदस्य स्वत: हजर होत्या. त्यांनी महिलांना याविषयची माहिती दिली.- संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली