शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१०० विहिरी तरीही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:32 IST

आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडच्या गोरजाई डोहावरील नळ योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वैरागड येथे ३० वर्षांपूर्वीची ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी नळ योजना आहे. गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याचे असमान वितरण गेल्या १५ दिवसांपासून या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील काही भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना गावातील नळ योजनेचे पाणी मिळत नाही, असे कुटुंब ज्या ठिकाणी नळ आहे, त्या ठिकाणी पाच ते सहा फुटाचे खड्डे करून नळाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील नळ योजनेची पाणी वितरण व्यवस्था अयोग्य व असमान आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. वैरागड गावातील पाणी संकट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचातय प्रशासनाने येथील गोरजाई डोहावर वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात नियोजन करण्यात आले. मात्र ही योजना मार्गी लागली नाही. पाणी कुठे मुरले, हे अद्यापही समजले नाही. २०१८ च्या मार्च महिन्यात या नळ योजनेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र २०१९ चा मार्च महिना उलटला तरी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुहूत सापडला नाही. परिणामी ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्याप्रती नाराजी व्यक्त होत आहे. गोरजाई डोहावरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ज्या काही तांत्रिक अडचणीत आहेत, त्या अडचणी दूर करून तत्काळ या योजनेचे काम हाती घेण्यात यावे, जेणे करून वैरागडातील पाणी संकट दूर होईल, असे नागरिकांची मागणी आहे.वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कागदोपत्री काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयातून वर्क आॅर्डर मिळणार असल्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर लगतच तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात येईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.- एन. ए. घुटके,ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत वैरागड