शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चिचडोह प्रकल्पासाठी हवेत १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:17 IST

जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव शासनाकडे सादर : आतापर्यंत ५३४.६६ कोटी रुपये खर्च, काही काम शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अजून १०० कोटी रुपयांची गरज भासणार आहे.या वाढीव निधीसाठी पाटबंधारे विभागाकडून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विदर्भ सिंचन विकास मंडळाअंतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पातून जवळपास ११ हजार ५१० हेक्टर शेतजमीन सिंचनासाठी प्रस्तावित केली आहे.चिचडोह प्रकल्पाच्या उभारणीसाठी सन २०१०-११ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजुरी दिली होती. काही वर्षानंतर या बॅरेजच्या कामाला सुरूवात झाली. प्रकल्प उभारणीसाठी शासनाच्या वतीने ५९७.४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पारित केला होता. मार्च २०१८ पर्यंत त्यापैकी ५३४.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतू प्रकल्पाचे काम पूर्णपणे झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १०० कोटी रुपयांची गरज असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.यासंदर्भात अभियंता राजेश किडेले यांनी सांगितले की, प्रकल्पाची चाचणी करण्यासाठी पाणी रोखले जात आहे. मात्र अजून काही काम बाकी आहे. त्या कामासाठी लागणाºया निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ते काम झाल्यानंतर आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाण्याचा वापर सिंचनासाठी होऊ शकेल. निधी वेळेत मिळाल्यास पुढील वर्षीच्या रबी हंगामात हे पाणी सिंचनासाठी मिळण्याची शक्यता आहे.हे काम आहे बाकीचिचडोह प्रकल्पाचे जास्तीत जास्त काम झाले आहे. मात्र अजून एक बॅरेज, दोन्ही बाजुने प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, रस्त्यांवर पुलांची उभारणी, विद्युत पुरवठा, स्विच यार्ड आदी कामे होणे बाकी आहे. ही कामे पूर्ण होताच प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात होऊ शकेल.