दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली या मागास आदिवासीबहुल जिल्ह्यात सहा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी विविध कामांवर सर्वात जास्त खर्च करून या योजनेत अव्वल स्थान मिळविले आहे. जिल्हा प्रशासनाने या दहा ग्रामपंचायतीचा समावेश ‘टॉप टेन’ मध्ये केला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. तत्कालीन युपीए केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची रोजगार नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात अंमलबजावणी सन २०१५-१६ या वर्षात करण्यात आली. जिल्ह्यात दहा नगर पंचायती अस्तित्वात येण्यापूर्वी जिल्ह्यातील एकूण ४६७ ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची विविध कामे घेण्यात आली. यापैकी दहा ग्रामपंचायतींनी सन २०१५-१६ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अव्वल काम केले आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर, सुंदरनगर, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, धानोरा तालुक्यातील जांभळी, फुलबोडी, मुस्का, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा, अंतरगाव, कोरची तालुक्यातील कोसमी नं. २ व आरमोरी तालुक्यातील पळसगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार व जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रोहयोच्या कामाचे नियोजन केले जाते. सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने ४०० वर ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण करून हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. गोविंदपूर, कोंढाळा ग्रा. पं. दुसऱ्यांदा टॉप टेनमध्ये४गोविंदपूर व कोंढाळा या दोन ग्रामपंचायतीने गतवर्षी प्रमाणेच यंदाही रोहयोच्या कामावर सर्वाधिक खर्च करून टॉप टेनमध्ये दुसऱ्यांदा स्थान मिळविले आहे. मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतीने गतवर्षी सन २०१४-१५ या वर्षात अकुशल व कुशल कामांवर एकूण १०८.६७ लाख रूपयांचा खर्च करून रोहयोत जिल्ह्यात टॉप टेन ग्रामपंचायतीमध्ये समावेश मिळविला. यंदाही या ग्रामपंचायतीने रोहयोच्या कामावर एकूण १४६.०९ लाख रूपयांचा खर्च केला. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा टॉप टेनमध्ये समावेश करण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतीने गतवर्षी २०१४-१५ या वर्षात रोहयोच्या कामावर एकूण ९७.४८ लाख रूपयांचा खर्च केला. त्यामुळे सदर ग्रामपंचायतीचा टॉप टेनमध्ये समावेश करण्यात आला.गोविंदपूर प्रथम तर कोंढाळा द्वितीय स्थानावर४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर या ग्रामपंचायतीने जिल्ह्यात रोहयोच्या विविध कामांवर सर्वाधिक १४६.९९ लाख रूपयांचा खर्च करून प्रथम स्थान मिळविले आहे. तर देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतीने रोहयो कामावर १२२.२९ लाख रूपयांचा खर्च करून द्वितीय स्थान पटकाविले आहे. असा आहे ग्रा. पं. च्या कामावरील खर्चाचा तपशीलग्रा. पं.कामांची संख्या अकुशलकुशलएकूण खर्च (लाखांत)गोविंदपूर१११९०.४३५६.५६१४६.९९कोंढाळा२३९९४.५८२७.७११२२.२९जांभळी५३६६.५५३६.५५१०३.०१सावलखेडा१७२४२.०३५८.१६१००.४६सुंदरनगर९१६५.२९३२.४२९७.७१फुलबोडी६७५३.१५४२.५२९५.६७अंतरगाव७८७७.८७१७.७९९५.६६कोसमी नं. २५२५०.०४४२.९२९२.९६मुस्का४३७०.९३२१.४७९२.०४पळसगाव७८६६.४५२५.५९९२.०४
रोहयो कामात दहा ग्रामपंचायती अव्वल
By admin | Updated: April 12, 2016 03:50 IST