शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

१० जटील शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:26 IST

स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मे पासून जुलै २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त १० महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजाराने ग्रस्त १० महिलांना जीवनदान मिळाले. सदर १० मोठ्या व जटील शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम व जनरल सर्जन डॉ.जयंत पर्वते यांच्या पुढाकाराने पार पडल्या आहेत.

ठळक मुद्देमहिला रुग्णालयात सुविधा : गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त महिलांना मिळाले जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मे पासून जुलै २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त १० महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजाराने ग्रस्त १० महिलांना जीवनदान मिळाले. सदर १० मोठ्या व जटील शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम व जनरल सर्जन डॉ.जयंत पर्वते यांच्या पुढाकाराने पार पडल्या आहेत.सदर महिला व बाल रुग्णालयात गर्भवती महिलांवर तसेच गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त महिलांवर औषधोपचार केला जातो. याशिवाय १२ वर्षांखालील मुला, मुलींवरही या रुग्णालयात औषधोपचार केला जात आहे. सदर रुग्णालयात तांबी बसविणे तसेच कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या या रुग्णालयात गर्भवती महिला, गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त महिला व १२ वर्षांखालील मुला- मुलींची औषधोपचारासाठी मोठी गर्दी होत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत गर्भाशय व इतर रोगांच्या महिलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी या रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रुग्ण रेफर केले जात आहेत. कारण राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित आहे.तीन महिन्यांत ३३० सिझर प्रसूतीजिल्हा महिला व बाल रुग्णालयात १० मे २०१८ पासून रुग्णभरतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर रुग्णालयात येथील डॉक्टरांच्या चमूने तब्बल ३३० गर्भवती महिलांची सिझर प्रसूती केली आहे. याशिवाय या रुग्णालयात अनेक नार्मल प्रसूतीही झाल्या आहेत. सदर महिला रुग्णालयात गडचिरोली शहर, तालुक्यासह इतर तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यातून गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल होत असतात. येथे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी चमू असल्याने महिला रुग्णांचा या रुग्णालयाकडे कल वाढला आहे. सर्व तपासण्याही येथे केल्या जात आहेत.दररोज १५० वर रुग्ण भरतीजिल्हा महिला व बाल रुग्णालयात १०० खाटांची सुविधा आहे. मात्र जुलै महिन्यात या रुग्णालयात दररोज सरासरी १६३ रुग्ण भरती झाले होते. रविवारी भरती असलेल्या रुग्णांची नोंद २५० होती. येथील खाटा कमी पडत असल्याने अनेक महिला व बाल रुग्णांना जमिनीवर गादीवर झोपून औषधोपचार घ्यावा लागत आहे. उपलब्ध असलेले मनुष्यबळही आरोग्य सुविधेसाठी कमी पडत आहे. या बाबीचा विचार करून शासनाने येथे आवश्यक मनुष्यबळ व खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.