शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१० उमेदवारांवर होणार कारवाई

By admin | Updated: February 16, 2017 01:49 IST

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर

तीन वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी : न. प. निवडणुकीचा खर्च सादर केला नाही गडचिरोली : निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांना पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जारी केले आहेत. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका निवडणूक लढविणाऱ्या १० उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे या उमेदवारांवर तीन वर्ष निवडणूक बंदीची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येणार आहे, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (ड) नुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर न केल्यास सदस्य म्हणून निवड झाली असेल तर अपात्र ठरविणे तसेच पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणे, अशी तरतूद आहे. दोन्ही नगर पालिका मिळून निवडणूक लढविणाऱ्या १० उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर केला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) हे उमेदवार आहेत कारवाईस पात्र नगर पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये देसाईगंज नगर परिषदअंतर्गत आकरे राजू यशवंत व चिंचेकार कल्पना पंढरी या दोघांचा समावेश आहे. गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या दिवटे अरूणा रामदास, मडावी योगेश रमेश, सावसाकडे मुकेश गोविंदराव, कुमरे विठ्ठल खुशाल, आत्राम अविनाश मोतीराम, गुरूनुले मीनाक्षी गजानन, उसेंडी बबीता मुकेश, बारापात्रे रेखा प्रभाकर या दहा उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्चाचा हिशेब प्रशासनाला दिला नाही. त्यामुळे हे दहा उमेदवार तीन वर्ष निवडणूक बंदीच्या कारवाईस पात्र असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.