शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिरकोंडा येथे बैलबंडीसह १ लाख ९४ हजारांचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 01:44 IST

बामणी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सिरकोंडा येथे दोन बैलबंडीमध्ये १२ नग साईज सागवान १ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले.

चार बैल जप्त : तस्कराच्या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी बामणी : बामणी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सिरकोंडा येथे दोन बैलबंडीमध्ये १२ नग साईज सागवान १ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले. २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता वन विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. यात १२ नग सागवान कटसाईज आकाराचे ३४ हजार रूपये व चार बैल, दोन बैलबंडी असा एकूण १ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दोन वनकर्मचारी तस्कराच्या हल्ल्यात जखमी झाले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वनस्करी सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला जबर जखमी करण्यात आले. याप्रकरणी सुरेश चिन्नगैरय्या कुमरी, प्रभाकर बापू दुर्गम, गंगाराम गोवारी दुर्गम, कोंडागोर्ला राजलिंगू शंकर या चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून हे फरार आहेत. सदर कारवाईसाठी बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी के. पी. गौरकर, वनपाल एस. ए. दांडेवार, वनरक्षक बी. पी. सोनकांबळे, वनरक्षक पी. आर. पाटील, वनरक्षक एस. यू. खोब्रागडे, वनरक्षक आर. डी. जोरताडे, वाहनचालक नीलेश चहाने, वनमजूर रवींद्र धर्मी यांनी परिश्रम घेतले. सदर कारवाई सिरकोंडा येथील कक्ष क्र. ११ पीएफ परिसरात घडली आहे. या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वनाधिकारी के. पी. गैरकर यांनी दिली आहे. सिरोंचा तालुक्यात नेहमीच वनतस्करांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असतात. (वार्ताहर)