शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

गाेंडवानाचे 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार हिवाळी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थ्यांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी काेणतीही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे. सदर बहुपर्यायी परीक्षेतील प्राप्त गुण संबंधित अभ्यासक्रमाच्या परीक्षा याेजनेनुसार परावर्तीत करण्यात येणार आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२२ पासून नियाेजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्न पद्धतीनुसार घेण्यात येणार आहे. आजी-माजी सर्व मिळून जवळपास १ लाख ३८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या वतीने ऑनलाइन प्रश्नपत्रिका डिलिव्हरी पद्धतीने पाेहाेचविण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थ्यांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी काेणतीही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे. सदर बहुपर्यायी परीक्षेतील प्राप्त गुण संबंधित अभ्यासक्रमाच्या परीक्षा याेजनेनुसार परावर्तीत करण्यात येणार आहेत. काेराेना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यामुळे निकालात बरीच वाढ झाली. 

६९ केंद्रांवरून हाेणार परीक्षा

गडचिराेली, चंद्रपूर या दाेन जिल्ह्यांसाठी गाेंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली असून सद्यस्थितीत दाेन्ही जिल्हे मिळून जवळपास २०५ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. याशिवाय विद्यापीठ परिसरात कॅम्पसमध्ये अनेक अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालय व विद्यापीठ कॅम्पसचे विद्यार्थ्यांसाठी मिळून या परीक्षेकरिता एकूण ६९ परीक्षा केंद्र राहणार आहेत. मागील परीक्षेत ६६ परीक्षा केंद्र हाेते. या परीक्षेसाठी नव्याने तीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

कर्मचारी संपाचा कामकाजावर परिणाम-    विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे कर्मचारी व महाविद्यालयीन कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संप करीत आहेत. कर्मचारी संपावर असल्याने विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित हाेत आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यापासून सुरू हाेणाऱ्या हिवाळी परीक्षेचे नियाेजन झाले असले तरी याबाबतचे कामही सध्या थांबले आहे.

७४ हजार नवीन प्रवेशित विद्यार्थीगाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२१-२२ या चालू वर्षात सर्व महाविद्यालये व कॅम्पस मिळून विविध अभ्यासक्रमांना नवीन ७४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. हे विद्यार्थी पहिल्यांदाच गाेंडवाना विद्यापीठाची बहुपर्यायी प्रश्नपद्धती असलेली परीक्षा देणार आहेत.

 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा