शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संधी मिळाल्यास भारतात प्रशिक्षण देण्यास आवडेल - दिएगो फोरलान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 05:31 IST

२०१० साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दिएगो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता.

मुंबई : ‘भारतात खेळताना मला खूप चांगले अनुभव आले. येथे खेळताना मजा आली. नक्कीच मला पुन्हा एकदा फुटबॉलच्या माध्यमातून येण्यास आवडेल. कदाचित संधी मिळाली, तर प्रशिक्षक म्हणूनही येथे येण्यास नक्कीच आवडेल,’ असे मत उरुग्वेचा स्टारफुटबॉलपटू दिएगो फोरलान याने व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या ला लीगा स्पर्धेसाठी भारताच्या एका अग्रणी टायर कंपनीने करार केला असून यानिमित्त मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमासाठी दिएगो सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. याआधी आयएसएल स्पर्धेत दिएगो मुंबई एफसी संघाकडून खेळला आहे. दिएगोने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘मला पुन्हा भारतात येण्यास आवडेल. येथे खेळण्याचा अनुभव शानदार आहे. भारतीयांनी माझे आणि माझ्या परिवाराचे जल्लोषात स्वागत केले आहे. तसेच येथील काही खेळाडूंसह माझी चांगली मैत्रीही आहे. संधी मिळाल्यास येथे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करण्यास नक्की आवडेल.’२०१० साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दिएगो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. नुकताच त्याने दक्षिण अमेरिकेतून फुटबॉल प्रशिक्षणाचा परवाना मिळवला असून या जोरावर तो द. अमेरिकेसह आशिया खंडातील कोणत्याही देशात प्रशिक्षण देऊ शकतो.मात्र सध्या त्याचे लक्ष्य युरोपमध्ये प्रशिक्षण परवाना मिळवण्याचे आहे. मँचेस्टर युनायटेड आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद या बलाढ्य क्लब संघांकडून चमक दाखवलेल्या दिएगोने भारतीय फुटबॉलवरही मत व्यक्त केले. त्याने म्हटले की, ‘भारताला मजबूत संघांमध्ये येण्यास थोडा आणखी वेळ लागेल. भारतात गुणवत्तेची कोणतीही कमी नाही, मात्र काही गोष्टींवर अद्याप काम करणे जरुरी आहे. भारतीय खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिला असून ते मेहनती आहेत आणि तंदुरुस्तीबाबत जागृत आहेत. सध्या भारतामध्ये तळागाळातील खेळाडूंसाठी भक्कम व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रशिक्षकांना भारतात आणावे लागेल.’

टॅग्स :Footballफुटबॉल