शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 07:06 IST

शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

- सचिन कोरडे मडगाव : शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोस्टारिका संघ २-१ ने पराभूत झाला. हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.सामन्याच्या सुरुवातीची दहा मिनिटे कोस्टारिका संघाने गाजवली. त्यांना बºयाच संधी मिळाल्या होत्या. मात्र, गोल नोंदवता आला नाही. चौथ्या मिनिटाला कोस्टारिकाची संधी थोडक्यात हुकली. लुका प्लोंगमान्न हा पास रोखण्यात अपयशी ठरला. दहा मिनिटांनंतर मात्र जर्मनीने कमालीची आक्रमकता दाखवली. २१ व्या मिनिटाला कर्णधार जॉन अर्पने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर कोस्टारिका-जर्मनीतील आघाडीपटूंमध्ये बरीच चकमक पाहायला मिळाली. ६१ व्या मिनिटाला आंद्रेस गोमेज याने एकाकीपणे चेंडूला गोलजाळ्याकडे नेत शानदार गोल नोंदवला. या गोलनंतर कोस्टारिका संघात जोश भरला होता. सामना संपण्यास अवघे एक मिनिट शिल्लक असताना अवुकू याने विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदवला.शांत झोप घेणार : क्रिस्टियन कुककोस्टारिका संघाविरुद्ध आम्ही विजय मिळवला असला तरी साजेशी कामगिरी करू शकलो नाही. पहिल्या दहा मिनिटांत आम्ही ढिसाळ खेळ केला. गेल्या आठवडाभरापासून आम्ही गोव्यात आहोत. आराम केलाच नाही. आता इराणविरुद्ध सामन्यापूर्वी आम्ही थोडी विश्रांती घेऊ, असे जर्मनीचे प्रशिक्षक कुक यांनी विजयानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.इराणचा गिनीवर विजयइराणने दहा खेळाडूंसह खेळणाºया गिनीचा ३-१ गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी १७ वर्षांखालील विश्वचषकात ‘क’ गटात शानदार सुरुवात केली. पहिल्या सत्रात बचावात्मक खेळ करणाºया इराणने दुसºया सत्रात तीन गोल नोंदवले. हे गोल अलाहयर सय्यद (५९ वा मिनिट), मोहम्मद शरीफी (७०) व बदली खेळाडू करीमी सय्यद (९०) यांनी केले.गिनी संघाकडून एकमेव गोल इंजुरी वेळेत नोंदवला गेला. हा गोल फांद्जे टोरी याने केला. चेरिफ कमारा याने फाउल केला त्यामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे गिनिला दुसºया सत्रात दहा खेळाडूंसह खेळावे लागले. या फाउलमध्ये इराणला पेनल्टी किक मिळाली. ज्यावर त्यांनी ७० व्या मिनिटाला गोल नोंदवला.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉलgoaगोवा