शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही बलाढ्य संघांवर दडपण आणू, भारतीय कोच माटोस यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:45 IST

खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

नवी दिल्ली : खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला.६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला ‘ब’ गटात कोलंबिया, अमेरिका आणि घाना संघासह स्थान मिळाले आहे. यावर माटोस म्हणाले, ‘आमचे खेळाडू संपूर्ण शक्तिनिशी खेळल्यास बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवू शकतील. भक्कम संघांपुढे आव्हान सादर करण्याची आमच्यात जिद्द व आहे. सामन्यात विजय मिळविण्याची ५ टक्के जरी संधी मिळाली तरी आम्ही विजयाचा प्रयत्न करणार आहोत.’भारतीय वरिष्ठ संघाचा गोललक्षक गुरप्रीतसिंग संधू म्हणाला, ‘भारताने यजमान होण्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण सकारात्मक असेल. यामुळे भारतात फुटबॉलची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. आम्हाला नाही पण सध्याच्या मुलांना हे मोठे व्यासपीठ मिळाले, ही अभिमानास्पद बाब आहे.’घरच्या परिस्थितीचा लाभ घेऊ : सुरेशसिंगजेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारताचा समावेश होत नसला तरीही स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असे मिडफिल्डर सुरेशसिंग वांगजाम याने म्हटले आहे. कुठलाही संघ पराभवाच्या दृष्टीने कधीच खेळत नाही. विजयासाठीच प्रयत्न करतो.आम्हीदेखील स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर चांगली कामगिरी करण्यासाठीच उतरणार आहोत.’ ब्रिक्स कप तसेच एएफसी १६ वर्षे गटाच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असलेला मणिपूरचा हा खेळाडू सर्वाधिक सामने खेळणाºयांपैकी एक आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा