शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

तिरंगी फुटबॉल मालिका : भारत-सेंट किट्स नेविस लढत आज, टीम इंडियाचा सलग दहाव्या विजयाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 02:05 IST

मॉरिशसविरुद्ध पिछाडीवरून बाजी मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ गुरुवारी तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध विजयाच्या निर्धाराने उतरेल.

मुंबई : मॉरिशसविरुद्ध पिछाडीवरून बाजी मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ गुरुवारी तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध विजयाच्या निर्धाराने उतरेल. विशेष म्हणजे या सामन्यात विजय मिळवून भारत सलग दहावा आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईतील अंधेरी येथीलमुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर हा सामना रंगेल.भारतीय संघ सेंट्स किट्स आणि नेविसला गृहीत धरण्याची चूक करणार नाही. ५ सप्टेंबरला होत असलेल्या आशियाई चषक पात्रता स्पर्धेतील मकाऊविरुद्धच्या सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारताला ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. भारताने आपल्या मागील आठ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांसह भूतानविरुद्धचा अनौपचारिक मैत्री सामनाही जिंकला होता. मॉरिशसविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने रॉबिन सिंग आणि बलवंत सिंग यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर २-१ असा विजय मिळवला. त्याचवेळी, प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन पहिल्या सामन्याप्रमाणेच सेंट किट्स आणि नेविसविरुद्धही युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात अमरिंदर सिंग, निखिल पुजारी आणि मनवीर सिंग यांना आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.भारताकडून आक्रमक रॉबिन आणि बलवंत आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. तसेच जेजे लालपेखलुआ आणि युवा मनवीर यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. बचावामध्ये कर्णधार संदेश झिंगन महत्त्वपूर्ण ठरेल.