शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी फुटबॉल : मॉरिशसचा विजय अंतिम क्षणी हुकला,  अंतिम क्षणी सेंट किट्स आणि नेविसने साधली बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:13 IST

भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मॉरिशसने तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या दुसºया सामन्यात सेंट किट्स आणि नेविस संघाला १-१ असे बरोबरीत रोखले.

मुंबई : भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मॉरिशसने तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या दुसºया सामन्यात सेंट किट्स आणि नेविस संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. मुंबतील अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मॉरिशसने नियंत्रित खेळ करताना फिफा क्रमवारीत आपल्याहून सरस असलेल्या सेंट्स किट्स आणि नेविसला बरोबरीत रोखले.मॉरिशसने पुन्हा एकदा आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना पहिल्या २० मिनिटांमध्येच गोल केला. फ्रेडरीक सराह याने १९व्या मिनिटाला शानदार हेडर करून चेंडूला गोलपोस्टची दिशा दिली. या दमदार गोलच्या जोरावर मॉरिशसने मध्यंतरासह जवळजवळ संपुर्ण सामन्यावर नियंत्रण राखले. परंतु, मॉरिशस एका गोलच्या जोरावर बाजी मारणार, असे दिसत असतानाच सेंट किट्स आणि नेविस यांनीजोरदार प्रत्युत्तर देताना ८७व्या मिनिटाला रॉजर किमारीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी पुनरागमनाचे खूप प्रयत्न केले. परंतु, गोल करण्यात अपयश आल्याने अखेर सामना १-१ असा बरोबरीमध्ये सुटला.मॉरिशसने अपेक्षित खेळ करताना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याजोरावर त्यांनी १९व्या मिनिटालाच खाते उघडले. डिफेंडर पास्कल डॅमियन बालिसनने केलेल्या क्रॉसवर सराहने अप्रतिम हेडर करत गोल केला. यानंतर, सामन्याच्या अंतिम क्षणी फॉरवर्ड टिशान हेनले याच्या पासवर किमारीने चेंडूला गोलपोस्टची दिशा देत संघाला बरोबरी साधून दिली.आता, २४ आॅगस्टला याच मैदानावर सेंट किट्स आणि नेविस संघ यजमान भारताविरुद्ध लढेल.