शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

त्रिकोणीय फुटबॉल मालिका : भारताची विजयी सलामी, मॉरिशसला २-१ गोलने नमवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 05:42 IST

रंगतदार झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय त्रिकोणीय फुटबॉल स्पर्धेत मॉरिशसचा पहिल्या सामन्यात २-१ असा पराभव करून विजयी सुरुवात केली. सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करताना बाजी मारली.

- रोहित नाईक।मुंबई : रंगतदार झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय त्रिकोणीय फुटबॉल स्पर्धेत मॉरिशसचा पहिल्या सामन्यात २-१ असा पराभव करून विजयी सुरुवात केली. सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करताना बाजी मारली. विशेष म्हणजे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाइन यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सलग नववा विजय मिळवला.मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेला हा सामना रोमांचक झाला. फिफा क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या भारताचा १६०व्या स्थानी असलेल्या मॉरिशसविरुद्ध विजय अपेक्षित होता. परंतु, मॉरिशसने शानदार खेळ करताना भारतीय खेळाडूंवर काहीसे दडपण टाकले. काहीसा आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला मॉरिशसवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीयांनी सावध भूमिका घेतली.रोलिन बोर्ग्स, युगेनसन लिंगदोह आणि हालिचरण नारझरी यांनी चांगले प्रदर्शन करताना मॉरिशसच्या आक्रमकांना रोखून धरले. परंतु, मेर्विन जोसलिन याने १५व्या मिनिटाला भारताच्या बचावफळीकडून झालेल्या चुकीचा फायदा उचलत मॉरिशसला १-० असे आघाडीवर नेले. या अनपेक्षित आक्रमणानंतर खडबडून जागे झालेल्या भारताने वेगवान खेळ करताना पुनरागमनाचे प्रयत्न केले. सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण करत भारताने आपला इरादा स्पष्ट केला.३७व्या मिनिटाला अनुभवी रॉबिन सिंगने मॉरिशसच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारताना महत्त्वपूर्ण गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. या गोलनंतर प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेताना भारताचा जयघोष केला. या वेळी, भारत पुन्हा आक्रमण करणार अशी अपेक्षा होती. परंतु, दोन्ही संघांच्या बचावफळीने प्रतिस्पर्धी आक्रमकांना रोखल्याने मध्यंतराला सामना १-१ असा बरोबरीत राहिला.दुसºया सत्रात भारताने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान या वेळी मुंबईकर निखिल पुजारीने आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना जॅकिचंद सिंगच्या जागी मैदानात प्रवेश केला. तसेच, गोलरक्षक सुब्रता पॉलऐवजी अमरिंदर सिंग, तर पहिल्या सत्रात गोल केलेल्या रॉबिन सिंगच्या जागी बलवंत सिंगला मैदानात उतरविण्यात आले. अनुभवी गोलरक्षक सुब्रताच्या जागी आलेल्या अमरिंदरने जबरदस्त बचाव करताना मॉरिशसचे आक्रमण रोखताना त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. दोन्ही संघांनी या वेळी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही. ६२व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआने केलेल्या पासवर बलवंत सिंगने अप्रतिम गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून देत विजय जवळपास निश्चित केला. यानंतर, भारताने बचावावर अधिक लक्ष केंद्रित करून अतिरिक्त धोका टाळला. मॉरिशसनेही सामना अतिरिक्त वेळेत गेल्यानंतर गोल करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु गोलरक्षक अमरिंदरचे भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. कर्णधार केविन ब्रू, जीन मेर्विन जोसलीन, जोनाथन जस्टीन, मार्को डोर्झा यांनी मॉरिशसकडून चांगला खेळ केला.प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद...भारताला पाठिंबा देण्यासाठी मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये सुमारे एक हजाराहून अधिक फुटबॉलप्रेमींनी उपस्थिती लावली होती. या वेळी प्रेक्षकांनी मॉरिशस संघाचे जोरदार स्वागत करतानाच त्यांच्या खेळाचे कौतुक करत खिलाडूवृत्तीही दाखवली. तसेच, सामन्याआधी एकत्रितपणे राष्ट्रगीत गाताना संपूर्ण स्टेडियम भारताच्या जयघोषाने दणाणून सोडले.